दाभोलकर हत्या प्रकरणाचा जवळपास ११ वर्षांनी निकाल लागणार

डॉ. दाभोलकर यांची २० ऑगस्ट २०१३ रोजी सकाळी सव्वासातच्या सुमारास पुण्यातील ओंकारेश्वर मंदिराजवळच्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर हत्या करण्यात आली. मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्या दाभोलकरांवर दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी तीन गोळ्या झाडल्या होत्या.

म. टा. प्रतिनिधी, पुणे : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणी विशेष न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याचा निकाल शुक्रवारी लागणार आहे. या खटल्यात पाच आरोपींविरोधात आरोप निश्चित करण्यात आले असून, हत्येच्या घटनेला पावणे अकरा वर्षे उलटून गेल्यावर हा खटला निकाली निघणार आहे.डॉ. दाभोलकर यांची २० ऑगस्ट २०१३ रोजी सकाळी सव्वासातच्या सुमारास पुण्यातील ओंकारेश्वर मंदिराजवळच्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर हत्या करण्यात आली. मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्या दाभोलकरांवर दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी तीन गोळ्या झाडल्या. त्यामध्ये डॉ. दाभोलकरांचा जागीच मृत्यू झाला. डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. प्रारंभी पुणे पोलिस, नंतर राज्य दहशतवादविरोधी पथक (एसआयटी) आणि नंतर केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) या प्रकरणाचा तपास केला