अभिनेता आयुष्यमान खुरानावर दु:खाचा डोंगर, पत्नीला 7 वर्षांनंतर पुन्हा…

प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक आणि अभिनेते (cancer)आयुष्मान खुराना यांची पत्नी ताहिरा कश्यप हिला स्तनाच्या कर्करोगाचे पुनरागमन झाले आहे. सात वर्षांपूर्वी या आजारावर यशस्वीपणे मात केल्यानंतर, आता पुन्हा एकदा तिला कर्करोगाचे निदान झाल्याची धक्कादायक माहिती तिने स्वतः सोशल मीडियाद्वारे दिली आहे. तिच्या या पोस्टनंतर चित्रपटसृष्टीतील कलाकार आणि चाहत्यांकडून तिच्यासाठी प्रार्थना आणि सदिच्छा व्यक्त केल्या जात आहेत.

इंस्टाग्राम पोस्टद्वारे दिली माहिती
ताहिरा कश्यप नेहमीच तिच्या सकारात्मक दृष्टिकोन आणि स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. कर्करोगाशी दिलेल्या लढ्याबद्दलही ती यापूर्वी उघडपणे बोलली होती. आता पुन्हा एकदा या आजाराचा सामना करावा लागत असल्याची बातमी तिने अत्यंत धीराने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केली आहे. तिने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे, “सात वर्षे वेदना सहन केल्यानंतर किंवा नियमित तपासणी केल्यानंतरही… मी दुसरा पर्याय निवडला आणि इतरांना नियमित मॅमोग्राम करत राहण्याचा सल्ला दिला. माझा राऊंड-2 सुरू झाला आहे.”
या पोस्टसोबत तिने #onemoretime हा हॅशटॅग वापरला, ज्यातून कर्करोगाचे पुनरागमन झाल्याचे स्पष्ट होते. तिने या पोस्टमधून केवळ आपल्या आरोग्याविषयी माहितीच दिली नाही, (cancer)तर इतरांनाही नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्व पटवून दिले आहे. सात वर्षांच्या यशस्वी लढ्यानंतर पुन्हा हा आजार समोर आल्याने अनेकांना धक्का बसला आहे.
२०१८ मधील निदान
ताहिराला पहिल्यांदा २०१८ साली स्तनाच्या कर्करोगाचे निदान झाले होते. त्यावेळी तिने अत्यंत धैर्याने आणि सकारात्मकतेने या आजाराचा सामना केला होता. केमोथेरपीमुळे केस गळाल्यानंतरही तिने आपला टक्कल असलेला लूक स्वीकारत त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते, ज्याचे अनेकांनी कौतुक केले होते. तिने आपल्या उपचारादरम्यानचे अनेक अनुभव आणि क्षणही चाहत्यांसोबत शेअर केले होते, ज्यामुळे अनेक कर्करोगग्रस्त रुग्णांना प्रेरणा मिळाली होती.

आता पुन्हा एकदा हा संघर्ष समोर आल्यानंतरही तिने आपली सकारात्मकता कायम ठेवली आहे. आपल्या ताज्या पोस्टमध्ये तिने लिहिले आहे, “हेच जीवन आहे! आणि तुम्ही त्याचा जास्तीत जास्त फायदा घ्या… हा अनुभव किती नम्र आहे याची तुम्हाला जाणीव झाली. मला अशा अनेक शूर महिला माहित (cancer)आहेत ज्यांनी त्यांच्या सर्व शक्तीनिशी लढा दिला आहे. मी त्या सर्वांचा सन्मान करते… आपल्यापैकी प्रत्येकजण किती महत्त्वाचा आहे हे जाणून घेण्यासाठी पृथ्वीवर यासारखे दुसरे काही नाही. जे करता येईल ते करा.” तिच्या या शब्दांमधून तिचा लढवय्या स्वभाव दिसून येतो.
हेही वाचा :
ग्राहकांना मोठा दिलासा! होम लोन, कार लोन होणार स्वस्त
9 जणींसोबत संसाराचा डाव मांडला, 6 जणींसोबत एकत्र झोपण्यासाठी….
सुंदर भाचीवर आला देखण्या मामाचा जीव दोघांनी एकत्र घालवली रात्र मन भरलं नाही म्हणून केलं कांड
उन्हाळ्यात तुमच्या लॅपटॉपचे नुकसान होण्यापासून वाचवतील या टिप्स नक्की फॉलो करा