आदिती राव आणि सिद्धार्थ अडकले एकमेकांच्या बंधनात, ४०० वर्षे जुन्या मंदिरात केले लग्न!

बॉलिवूड अभिनेत्री आदिती राव हैदरी आणि सिद्धार्थ विवाहबंधनात(married) अडकले आहेत. दोघांनी वानपर्थीच्या 400 वर्ष जुन्या श्रीरंगपूर मंदिरात गुपचूप लग्न केले आहे. सुंदर जागा निवडण्याऐवजी या जोडप्याने या मंदिरासमोर लग्न करणे पसंत केले. अभिनेत्रीने तिच्या लग्नाचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. जे पाहून चाहत्यांना खूप आनंद झाला आहे.

अदिती राव हैदरी लग्नाचे (married)फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. हे शेअर केले फोटो पाहून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. कारण या दोनीही जोडप्यानी गुपचूप लग्न केले असून, हे दोघेही आता लग्न बंधनात अडकले आहेत. तसेच शेअर केलेल्या फोटोमध्ये आदिती आणि सिद्धार्थ दोघेही खूप सुंदर आणि आकर्षित दिसत आहेत.

अभिनेत्रीने ऑफ व्हाईट रंगाची साडी परिधान केली असून, अभिनेत्याने साऊथ पोशाख परिधान केला आहे. दोघेही एकत्र खूप क्युट दिसत आहेत. या दोघांनीही ४०० वर्ष जुन्या मंदीरात आपला लग्न समारंभ पार पडला आहे. तसेच याच मंदीराजवळ या जोडप्यांनी सुंदर पोज देत त्यांच्या लग्नाचे फोटो क्लिक केले आहेत.

या दोन्ही अभिनेत्यांचे हे दुसरे लग्न आहे. आदितीचे पहिले लग्न सत्यदीप मिश्रासोबत झाले होते, जो आता मसाबा गुप्ताचा पती आहे. त्यांचे लग्न फक्त 4 वर्षे टिकले. आणि त्यानंतर हे दोघेही वेगळे झाले. तसेच, सिद्धार्थचेही पहिले लग्नही फार काळ टिकले नाही.

वधू आणि वर आदिती आणि सिद्धार्थ यांचा लग्नाचा लूक अगदी साधा आहे. वधू अदितीने साधी सोनेरी साडी परिधान केली आहे. तिचा दक्षिण भारतीय लूक पूर्ण करून तिने कानातले, बांगड्या, गळ्यात चोकर आणि केसात गजरा घातला आहे. तर सिद्धार्थ पांढरा कुर्ता आणि गोल्डन बॉर्डर असलेल्या लुंगीमध्ये दिसला. चित्रांमध्ये लग्नाचे अनेक विधी दाखवले आहेत. यानंतर दोघांनी एकमेकांना मिठी मारली.

अभिनेत्रींचे या पोस्टवर चाहत्यांचा भरपूर प्रतिसाद मिळत आहे. या दोघांनावरही चाहते शुभेच्छाचा वर्षाव करत आहेत. तसेच चाहत्यांसह अनेक मोठ्या हिंदी आणि साऊथ सेलेब्रेटींनी या जोडप्याना अभिनंदन करत आहेत. हे दोघेही या दोन्ही इंडस्ट्रीमधील आवडते जोडपं आहे.

हेही वाचा:

शनीदेवाच्या कृपादृष्टीमुळे ‘या’ राशी होणार गडगंज श्रीमंत

राज्यातील शाळा ‘या’ तारखेला बंद राहणार, शिक्षकांचा आंदोलनाचा इशारा

कार्तिक आर्यन पुन्हा तृप्ती डिमरीच्या प्रेमात पडणार?