मंत्रिमंडळविस्तार, खातेवाटपानंतर आता ‘या’ मुद्द्यावरून शिंदे गटाच्या नेत्यामंध्ये नाराजी
मुंबई: महाराष्ट्रात नुकताच मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर मुख्यमंत्री(leaders) एकनाथ शिंदे यांची शिवसेना, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांमध्ये नाराजीचे सूर उमटू लागले आहेत. मंत्रिपद न मिळाल्यामुळे अनेक नेत्यांनी जाहीर नाराजीही व्यक्त केली.
महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी खातेवाटप करण्यात आले,त्यावरूनही अनेक नेत्यांमध्ये नाराजी आहे. या नाराजीत आता आणखी एका मुद्द्याची भर पडली आहे. मंत्रिमंडळ विस्तार, खातेवाटपानंतर नवनिर्वाचित मंत्र्यांना त्यांच्या शासकीय निवासस्थानांचे वाटप करण्यात आले. त्यावरूनही अनेक मंत्र्यांची(leaders) नाराजी समोर आली आहे. सरकारी निवासस्थानांबाबत मंत्र्यांमध्ये मतभेद सुरू झाले आहेत.
काही रिपोर्ट्सनुसार, यावेळी शिंदे गटाच्या काही मंत्र्यांना सरकारी बंगल्याऐवजी फ्लॅट वाटप करण्यात आल्याचे बोलले जात आहे, त्यामुळे ते नाराज झाले आहेत. जनतेच्या सेवेसाठी मंत्र्यांना बंगले असणे आवश्यक झाले आहे. यावरून संताप व्यक्त होत असल्याने राज्याच्या विकासासाठी आता मंत्र्यांना बंगला असणे गरजेचे आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
यावेळी भाजपच्या अनेक बड्या मंत्र्यांना मोठे आणि पॉश सरकारी बंगल्याचे वाटप करण्यात आले आहे. तर एकनाथ शिंदे गटातील शिवसेनेच्या काही कॅबिनेट मंत्र्यांना फ्लॅटचे वाटप करण्यात आले आहे. यावेळी दोन्ही पक्षांच्या मंत्र्यांना दिलेल्या फ्लॅटची यादी सरकारच्या आदेशानुसार असल्याचे समोर आले आहे.
राहुल नार्वेकर – शिवगिरी
चंद्रशेखर बावनकुळे- रामटेक
राधाकृष्ण विखे पाटील- रॉयलस्टोन
पंकजा मुंडे- पर्णकुटी
शंभूराजे देसाई- मेघदूत
संजय राठोड – शिवनेरी
गणेश नाईक- पवनगड
धनंजय मुंडे- सातपुडा
चंद्रकांत पाटील-सिंहगड
शिवेंद्रराजे भोसले- पन्हाळगड
जयकुमार गोरे- प्रचितीगड
गुलाबराव पाटील- जेतवण
नरहरी झिरवाळ- सुरुची 9
संजय सावकारे- अंबर 32
प्रताप सरनाईक- अवंती 5
संजय शिरसाट- अंबर 38
मेघना बोर्डीकर – सुनीती 6
योगेश कदम – सुनिती 10
गिरीश महाजन- सेवा सदन
आशिष जैस्वाल – सुनीती1
मंगल प्रभात लोढा- विजयदुर्ग
भरत गोगावले- सुरुची 2
माधुरी मिसाळ – सुरुची 18
अशोक उईके- लोहगड
प्रकाश आबिटकर – सुरुची 15
माणिकराव कोकाटे – अंबर 27
मकरंद पाटील- सुरुची 3
अदिती तटकरे- प्रतापगड
दत्तात्रय भरणे- सिद्धगड
आशिष शेलार- रत्नशिशु
पंकज भोयर – सुनिती 2
इंद्रनील नाईक – सुनीती 9
हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयाचे विभाजन केले. यावेळी अर्थखाते पुन्हा एकदा अजित पवार यांच्याकडे गेले, तर देवेंद्र फडणवीस यांनी गृहखाते स्वत:कडे ठेवले आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास खाते देण्यात आले आहे.
हेही वाचा :
रोहित शर्माच्या दुखापतीबाबत आली मोठी अपडेट!
स्वयंपाक सुरू असतानाच गॅस सिलिंडरचा स्फोट; घर जळून खाक
उद्धव ठाकरे अॅक्शनमोडवर! लवकरच निवडणुकीचा धुराळा उडणार