राजकारणात गेल्यावर पुन्हा उडवली कंगनाने बॉलीवूडची खिल्ली!

कंगना रनौतची मुलाखत : बॉलीवूड अभिनेत्री कंगना रनौत नेहमीच्या(politics) तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असते. कोविडच्या काळामध्ये तिने राजकीय पक्षांवर सुद्धा अनेक वादग्रस्त वक्तव्य केले होते यावेळी तिला X (पूर्वीचे ट्विटर) वरून सुद्धा बॅन करण्यात आले होते.

बऱ्याचवेळा तिने बॉलीवूडमधील अनेक कलाकारांवर निशाणा(politics) साधला आहे. त्यामुळे तिच्यावर अनेकदा बॉलीवूड कलाकारांनी काम करणं सुद्धा बंद केलं होत. आता पुन्हा एकदा कंगना रनौतने बॉलीवूडवर तोशेरे ओढले आहेत. यामध्ये तिने बॉलीवूडमधील पार्टींमध्ये कशाप्रकारे वागणूक असते त्याची खिल्ली उडवण्यात आली आहे. एवढेच नव्हे तर बरेच अपशब्द देखील तिने तिच्या मुलाखतीमध्ये वापरले आहेत.

प्रसिद्ध युट्युबर राज शमानीने कंगना रनौतची एक खास मुलाखत घेतली आहे. यावेळी त्याने तिला बॉलीवूडमध्ये तुझे कोणी मित्र मैत्रिणी आहेत का? असा प्रश्न विचारला. यावेळी कंगना म्हणाली, मी बॉलीवूड प्रकारची व्यक्ती नाही आणि मी त्यांच्यासोबत अजिबात मैत्री करू शकणार नाही. बॉलीवूड कलाकार हे त्यांच्यामध्ये एवढे गुंतले आहेत, ते मूर्ख आहेत त्यांना काही कळत नाही.

यावर राज शमानी म्हणाला की, सगळे थोडी ना असे असू शकतात. यावर कंगना म्हणाली की, मी बरंच बॉलीवूड पाहिलं आहे तू मला नाही सांगू शकत, तुला ते माहिती आहे. बॉलीवूडची दिनचर्या सकाळी उठणं, व्यायाम करणं घरी येणं आणि झोपणं ही त्यांची रोजची दिनचर्या आहे. त्यांची डोकी पूर्णपणे रिकामी आहे असे कंगनाने सांगितले.

हेही वाचा :

आश्चर्यकारक! जळत्या चितेतून तो उठला; व्हिडिओ पाहून व्हाल थक्क

कथित अब्जाधीश बॉयफ्रेंडसोबत बाईकवर फिरताना दिसली सुशांतची Ex गर्ल्डफ्रेंड

‘त्रिदेव अजिंक्य’! कोल्हापुरात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे फिल्मी स्टाईल बॅनर