रोहित-विराटनंतर कोण सांभाळणार भारतीय संघाची धुरा!

रोहित शर्मा-विराट कोहली : भारताचा संघ(team) आगामी मालिका बांग्लादेशविरुद्ध खेळणार आहे. यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये भारताचा कर्णधार रोहित शर्माचं असणार आहे. भारतीय संघाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली T२० विश्वचषक जिंकला. त्यानंतर संपूर्ण देशामध्ये उत्साह साजरा करण्यात आला होता. परंतु त्यादरम्यान विराट कोहली आणि रोहित शर्माने T२० फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.

आता ती वेळ दूर नाही जेव्हा हे दोन्ही दिग्गज भारतीय क्रिकेट संघाचा(team) निरोप घेतील आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट किंवा क्रिकेटमधून पूर्णपणे निवृत्त होतील. आता मुंबई इंडियन्स मुख्य फिरकी गोलंदाज पियुष चावलाने एक मुलाखत दिली आहे. यामध्ये त्याने अनेक मोठे खुलासे केले आहेत.

रोहित शर्मा आणि विराट कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर भारतीय चाहत्यांच्या मनात एक प्रश्न नक्कीच येत असेल की कोहली आणि रोहितनंतर दोघांची जबाबदारी कोण सांभाळणार? या प्रश्नाचे उत्तर भारतीय क्रिकेट संघाचा माजी फिरकीपटू पियुष चावलाने दिले आहे. शुभंकर मिश्राच्या यूट्यूब चॅनलवर बोलत असताना पियुष चावलाने विराट कोहली आणि रोहित शर्माच्या जागी शुभमन गिल आणि ऋतुराज गायकवाड यांची नावे घेतली.

पियुषने नुकतेच आपले मत शेअर केले, कारण विराट कोहली आणि रोहित शर्मासारख्या दिग्गजांची जागा घेणे अशक्य आहे, जसे आजपर्यंत कोणीही सचिन तेंडुलकर आणि सुनील गावस्कर सारख्या महान फलंदाजांची जागा घेऊ शकले नाही. तथापि, असे नक्कीच होऊ शकते की एक खेळाडू निघून गेल्यावर, त्याच पद्धतीने दुसरा खेळाडू कामाचा भार घेतो.

हेही वाचा:

राहुल गांधींविरोधात भाजप आक्रमक; आज राज्यभरात आंदोलन

शेअर बाजारात नवा स्कॅम; ‘या’ व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून होतेय फसवणूक

कोल्हापुरात गणेश विसर्जन मिरवणुकीत लेसर लाईट्सवर बंदी!