घटस्फोटाच्या बातमीनंतर ‘ही’ बॉलीवूड सुंदरी येणार बिग बॉसच्या घरात

प्रसिद्ध शो ‘बिग बॉस’चा 18वा सीझन काही दिवसातच सुरू होणार आहे. जसजसे दिवस जात आहेत तसतशी या शोबद्दल चाहत्यांची(tv show) उत्सुकताही वाढत आहे. दार वर्षीप्रमाणे या सिझनमध्येही काहीतरी वेगळे पाहायला मिळणार आहे. बिग बॉस 18 मध्ये एक टाईम क्रंच असेल, ज्या अंतर्गत बिग बॉस अनेक दिवस स्पर्धकांचे भविष्य ठरवणार आहे.

आत्तापर्यंत, सलमान खानच्या या शोसाठी(tv show) केवळ निया शर्माचेच नाव निश्चित स्पर्धक म्हणून समोर आले आहे. ‘खतरों के खिलाडी 14’ च्या ग्रँड फिनालेमध्ये रोहित शेट्टीने खुलासा केला होता की निया बिग बॉस 18 मध्ये दिसणार आहे. त्याचवेळी, आता या शोसाठी आणखी एका अभिनेत्रीचे नाव जवळपास निश्चित झाल्याचे सांगितले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बिग बॉसच्या घरात बॉलीवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर सलमान खानच्या १८ व्या सीझनमध्ये दिसू शकते. त्याचे नाव जवळपास निश्चित झाल्याचे सांगितले जात आहे. असे झालेच तर बऱ्याच दिवसांनी त्यांना पडद्यावर पाहणे मनोरंजक ठरेल. चाहत्यांना देखील या बातमीचा आनंद झाला आहे.

उर्मिला मातोंडकर गेल्या काही दिवसांपासून घटस्फोटाच्या अफवांमुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी बातमी आली होती की, उर्मिला लग्नाच्या 8 वर्षानंतर मोहसिन मीर अख्तरपासून विभक्त होत आहे. मात्र, याबाबत या जोडप्याकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. उर्मिला मोहसिनपेक्षा 10 वर्षांनी मोठी आहे. आणि आता याचदरम्यान आता अभिनेत्री बिग बॉसच्या घरात कल्ला करताना दिसणार आहे.

उर्मिला मातोंडकरने सलमान खानसोबत ‘जानम समझा करो’ या चित्रपटामध्ये काम केले आहे. हा सिनेमा 1999 मध्ये रिलीज झाला होता, जो फ्लॉप ठरला होता. यानंतर दोघांनी कधीही एकत्र काम केले नाही.

हेही वाचा :

महिनाभरात पैसे झाले दुप्पट; 6 रुपयांच्या या शेअरने गुंतवणुकदारांना केले मालामाल!

‘आमच्या खेळाडूपासून दूर राहा’, पाकिस्तानी खेळाडू फेव्हरेट म्हणणाऱ्या उर्वशी रौतेलाला धमकी

केवळ 99 रुपयांत मिळणार ब्रँडेड दारु, या राज्य सरकारकडून नवीन एक्साईज पॉलिसी लागू!