अहमदाबादची पुनरावृत्ती! पुन्हा विमान कोसळलं अन् सगळे ठार

पुन्हा विमानाची मोठी दूर्घटना घडली असून रशियन प्रवासी विमान गुरुवारी (२४ जुलै) बेपत्ता झाले होते. परंतु आता विमान क्रॅश झाल्याची माहिती मिळत आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, या प्रवासी विमानात 49 प्रवासी होते. अंगारा एअरलाइन्सचे विमान(Plane ) चीनच्या सीमेवरील अमूर प्रदेशातील टिंडा शहराकडे जात होते, परंतु त्यांचा हवाई वाहतूक नियंत्रणाशी संपर्क तुटला. आता रशियन माध्यमांनी दावा केला आहे की विमानाचे अवशेष सापडले आहेत.

रशियन वृत्तसंस्था इंटरफॅक्सच्या वृत्तानुसार, रशियाचे An-24 प्रवासी विमान टिंडा विमानतळावर उतरण्याचा प्रयत्न करत होते, परंतु त्याचा पहिला प्रयत्न अयशस्वी झाला. दुसऱ्या प्रयत्नासाठी ते आकाशात फिरत होते आणि नंतर बेपत्ता झाले. प्रादेशिक गव्हर्नर वसिली ऑर्लोव्ह म्हणाले की, सुरुवातीच्या माहितीनुसार, विमानात ४३ प्रवासी आणि सहा क्रू मेंबर्स होते, ज्यात पाच मुले होती.

वैमानिकाच्या चुकीमुळे विमान क्रॅश झाले का?
मिळालेल्या माहितीनुसार, सुरुवातीच्या अहवालांमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, विमान पायलटच्या चुकीमुळे क्रॅश झाले. दुसऱ्यांदा लँडिंग करण्याचा प्रयत्न करताना, खराब हवामानामुळे त्याला काहीही स्पष्ट दिसत नव्हते आणि म्हणूनच हा अपघात झाला.

विमान सुमारे ५० वर्षे जुनं
सायबेरियातील अंगारा एअरलाइन्सचे हे विमान सुमारे ५० वर्षे जुने असल्याचे सांगितले जाते. त्याच्या शेपटीच्या क्रमांकावरून ते १९७६ मध्ये बांधले गेले असल्याचे दिसून येते. बचाव पथक हेलिकॉप्टरद्वारे विमानाचा(Plane ) शोध घेत होते, तेव्हा विमानाचा पुढचा भाग जमिनीवर जळताना दिसला. हे पाहून बचाव पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले. दरम्यान टिंडा विमानतळ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की पायलट दुसऱ्यांदा लँडिंग करण्याचा प्रयत्न करत होता. त्याच्याकडून काही प्रकारची चूक झाल्याची शंका आहे. अंगारा एअरलाइन्सचे हे विमान अचानक रडारवरून गायब झाले होते.

दोन महिन्यांपूर्वी धावपट्टीवर आग
अंगारा एअरलाइन्सच्या AN-24 विमानाला दोन महिन्यांपूर्वी धावपट्टीवर आग लागली. विमान किरेन्स्कमध्ये उतरताच विमानाला आग लागली. वेळी कोणतीही जीवितहानी झाली नाही. जुलै २०२३ मध्ये AN-24 मालिकेचे एक विमान कोसळले. त्यावेळी विमानात ३७ प्रवासी होते.

विमान १९७६ मध्ये बांधले
An-24 विमान १९७६ मध्ये कीवमधील एव्हिएंट विमान कारखान्यात बांधले गेले होते. त्याच वर्षी त्याने पहिले उड्डाण केले. २०२१ मध्ये, विमानाचे विमान उड्डाणयोग्यता प्रमाणपत्र २०३६ पर्यंत वाढविण्यात आले. गव्हर्नर इगोर कोब्झेव्ह म्हणाले की अमूर प्रदेशात कोसळलेल्या AN-24 विमानातील क्रू मेंबर्स इर्कुत्स्क प्रदेशातील रहिवासी होते.

क्रॅशस्थळी पोहोचण्यात अडचण
क्रॅश झालेल्या AN-24 चे अवशेष अर्धा किलोमीटरपर्यंत विखुरलेले आहेत. अपघातस्थळी उतरणे अशक्य आहे. बचाव पथके दोरीच्या मदतीने तिथे उतरवण्याची योजना आखत आहेत. २४ जुलै रोजी सकाळी ७:३६ वाजता विमानाने खाबरोव्स्क येथून उड्डाण केले. अंगारा एअरलाइन्सचे हे विमान(Plane ) खाबरोव्स्क – ब्लागोवेश्चेन्स्क – टिंडा मार्गावर होते.

अंगारा एअरलाइन्सबद्दल जाणून घ्या
अंगारा एअरलाइन्स ही ईस्टलँड ग्रुपची उपकंपनी आहे. तिची स्थापना २००० मध्ये झाली. रशिया आणि सायबेरियामध्ये देशांतर्गत उड्डाणांसाठी ही आघाडीची एअरलाइन आहे. अंगारा देशांतर्गत उड्डाणे तसेच चार्टर उड्डाणे चालवते.

अंगारा एअरलाइन्सचा इर्कुत्स्क विमानतळावर विमान देखभाल आणि ग्राउंड हँडलिंगसाठी सर्वात मोठा तळ आहे (हँगर कॉम्प्लेक्स, पार्किंग, ग्राउंड स्टाफ इ.). पनीच्या मते, तिच्या ताफ्यात ३२ विमाने आहेत, ज्यात पाच AN-१४८, सात AN-२४, तीन AN-२६-१००, दोन AN-२ आणि अकरा Mi-८ हेलिकॉप्टर विविध सुधारणांमध्ये आहेत.

हेही वाचा :