फक्त भारतात नाही तर जगभरात EVs चा डंका ! येत्या काळात पेट्रोल-डिझेलच्या कार नाहीसे होणार?

भारतासह जगभरात इलेक्ट्रिक वाहने(Electric vehicles) मोठ्या प्रमाणात विकली जात आहेत. मार्केटमधील हीच वाढती मागणी पाहता अनेक ऑटो कंपन्या उत्तम रेंज आणि फीचर्स असणाऱ्या इलेक्ट्रिक कार, बाईक आणि स्कूटर लाँच करत आहे. असे बोलले जात आहे की 2030 पर्यंत इलेक्ट्रिक पॅसेंजर कारचा बाजारातील वाटा 40% पेक्षा जास्त होण्याच्या मार्गावर आहे.

2024 मध्ये EVs ला जोरदार मागणी मिळाली. यातच 2025 मध्ये इलेक्ट्रिक कारची जागतिक विक्री 20 मिलियनपेक्षा जास्त होण्याच्या मार्गावर आहे, जी जगभरात विकल्या गेलेल्या कारच्या एक चतुर्थांश पेक्षा जास्त आहे. एका अहवालात असे दिसून आले आहे की अलिकडच्या आर्थिक अडचणींमुळे ऑटो क्षेत्रावर दबाव निर्माण झाला आहे, तरीही इलेक्ट्रिक कारची जागतिक विक्री उत्तम राहिली आहे. याचे उत्तम कारण म्हणजे ग्राहकांना इलेक्ट्रिक(Electric vehicles) मॉडेल्स अधिकाधिक परवडत आहेत.

2024 मध्ये EVs ची जागतिक स्तरावर विक्री 17 दशलक्षांपेक्षा जास्त झाली, ज्यामुळे IEA ने पूर्वी अंदाज लावल्याप्रमाणे, जागतिक ऑटो बाजारात EV चा वाटा पहिल्यांदाच 20% पेक्षा जास्त झाला. आणि 2025 च्या पहिल्या तीन महिन्यांत, इलेक्ट्रिक कारची(Electric car) विक्री वर्षानुवर्षे 35% वाढली. सर्व प्रमुख मार्केटमध्ये आणि इतर अनेक मार्केटमध्ये पहिल्या तिमाहीतील विक्रीचे नवीन विक्रम दिसून आले.

चीनने ईव्ही मार्केट लीडर म्हणून आपले स्थान कायम ठेवले आहे. गेल्या वर्षी चीनमध्ये विकल्या गेलेल्या इलेक्ट्रिक कारची संख्या (11 मिलियनपेक्षा अधिक) ही 2022 मध्ये जगभरात विकल्या गेलेल्या एकूण कारच्या सारखीच आहे. आशिया आणि लॅटिन अमेरिकेतील विकसनशील मार्केट देखील वाढीची नवीन केंद्रे बनली आहेत. 2024 मध्ये या प्रदेशांमध्ये एकूण इलेक्ट्रिक कार विक्री 60% पेक्षा जास्त वाढली आहे आणि सेल्स शेअर जवळजवळ 2.5% वरून 4% पर्यंत दुप्पट झाला आहे.

आशियातील (चीन वगळता) 2024 मध्ये इलेक्ट्रिक कारच्या(Electric vehicles) विक्रीत मोठी वाढ झाली आहे, जी 2023 च्या तुलनेत 40% पेक्षा जास्त आहे. भारतात, इलेक्ट्रिक पॅसेंजर कारची मागणी वाढली आहे, विशेषतः गेल्या वर्षी. 2024 च्या आर्थिक वर्षात देशात 99,378 नवीन इलेक्ट्रिक कार विकल्या गेल्या, ज्याची वार्षिक वाढ 20% आहे .

पेट्रोल-डिझेल कार्सचे भविष्य धोक्यात?
EVs ला मिळणारी वाढती मागणी पाहता आता पेट्रोल आणि डिझेल कारचे भविष्य काय असा प्रश्न विचारला जात आहे. खरंतर, आता इलेक्ट्रिक कार्सना मागणी जरी असली तरी याचा परिणाम सध्यातरी पेट्रोल आणि डिझेल कार्सवर होणार नाही.

हेही वाचा :

महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपचा मोठा डाव; ‘तोच’ फॉर्म्युला वापरणार

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीला कोरोनाची लागण, इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत दिली माहिती

महाराष्ट्राच्या राजकारणात मटका किंगची एन्ट्री! गंभीर गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगाराचा मोठ्या पक्षात पक्षप्रवेश