पुढच्या महिन्यात भारतात एक नवीन स्मार्टफोन कंपनी दाखल होणार आहे आणि हे कंपनी स्मार्टफोन(smartphone) मार्केट हादरवून टाकणार आहे. हो, AI+ ब्रँडचे नवीन स्मार्टफोन पुढच्या महिन्यात बाजारात येणार आहेत. कंपनीने अद्याप या नवीन डिव्हाइसच्या लाँचिंग तारखेची पुष्टी केलेली नसली तरी, कंपनीने आगामी AI+ Pulse आणि AI+ Nova 5G चे डिझाइन आणि कलर ऑप्शंसचा खुलासा केला आहे.
हा फोन ड्युअल रिअर कॅमेराने सुसज्ज असणार ज्यामध्ये 50-मेगापिक्सेलचा प्राथमिक कॅमेरा उपलब्ध असेल. हे दोन्ही स्मार्टफोन पुढील महिन्यात लाँच केले जातील. असा दावा केला जात आहे की हे फोन हाय-स्पीड परफॉर्मन्स, नेक्स्ट-जनरेशन कनेक्टिव्हिटी आणि स्मूथ अनुभव देतील. तथापि, हँडसेटमध्ये वॉटरड्रॉप नॉच दिसू शकतो ज्यासह फ्लॅट डिस्प्ले उपलब्ध असेल. चला या दोन्ही स्मार्टफोन्स(smartphone) बद्दल जाणून घेऊया.
AI+ Pulse, AI+ Nova 5G चे कलर व्हेरिएंट
कंपनीने अलीकडेच त्यांच्या X अकाउंटवर आगामी AI+ Pulse आणि AI+ Nova 5G हँडसेटच्या कलर व्हेरिएंटचा खुलासा करणारा टीझर शेअर केला आहे. टीझरमध्ये हे फोन वेगवेगळ्या रंगांमध्ये दिसत आहेत. एका प्रेस रिलीजमध्ये कंपनीने म्हटले आहे की हे डिव्हाइस काळ्या, निळ्या, हिरव्या, गुलाबी आणि जांभळ्या रंगाच्या पर्यायांमध्ये येतील. दोन्ही डिव्हाइसमध्ये ड्युअल रियर कॅमेरे आपल्याला पाहायला मिळेल, ज्यात 50-मेगापिक्सेलचा प्राथमिक कॅमेरा आहे.
विशेष AI वैशिष्ट्ये असतील उपलब्ध
टीझरमध्ये असेही दिसून आले आहे की AI+ Nova 5G मध्ये AI फोटोग्राफी आणि एडिटिंग वैशिष्ट्ये दिसणार आहेत. AI+ Nova 5G च्या फ्रंट पॅनलच्या डिझाइनवरून असे दिसून येते की त्यात वॉटरड्रॉप नॉचसह फ्लॅट डिस्प्ले असेल. कंपनीने X वर शेअर केलेल्या टीझरमध्ये असेही सांगितले आहे की हे डिव्हाइस पुढील महिन्यात जुलैमध्ये लाँच केले जाईल.
फोनची मायक्रोसाइट फ्लिपकार्टवर आधीच लाईव्ह झाली आहे. म्हणजेच, हे डिव्हाइस ई-कॉमर्स साइट्सद्वारे देशात खरेदीसाठी विशेषतः उपलब्ध असेल. AI+ Pulse आणि AI+ Nova 5G मध्ये लाल रंगाचे पॉवर बटण असेल. असा दावा केला जात आहे की डेटा प्रायव्हसी आणि रिस्पॉन्सिव्ह मल्टीटास्किंगमध्ये हा फोन खूपच चांगला असेल.
हेही वाचा :