सलमान मला मारायचा ऐश्वर्या रायच्या वक्तव्याने बाॅलिवूडमध्ये खळबळ
बाॅलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायने 90 च्या दशकात तिच्या अभिनयाने (audience)प्रेक्षकांच्या मनात घर केलं होतं. आज देखील ऐश्वर्या रायच्या चित्रपटांची चर्चा होत असते. ऐश्वर्या तिच्या प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफमुळे चर्चेत असते.गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या आणि सलमान खान यांच्या ब्रेकअपच्या चर्चां रंगल्यात. ऐश्वर्या आणि सलमान खान यांचं एकमेकांवर प्रेम होतं. मात्र काही कारणांमुळे या दोघांनी त्यांच्या नात्याला पूर्णविराम दिला. दरम्यान एका जुन्या मुलाखतीमध्ये बोलताना सलमानबाबत ऐश्वर्याने खुलासा केला होता.
मुलाखतीमध्ये बोलत असताना तू सलमानसोबत ब्रेकअप का केलं? असा प्रश्न ऐश्वर्याला विचारण्यात आला. यावेळी ऐश्वर्या म्हणाली की, सलमान दारु पीऊन धिंगाणा घालायचा. (audience)एवढंच नाही तर, तो शिवीगाळ देखील करायचा. त्यांनी माझ्यावर शारीरिक, शाब्दिक आणि मानसिक आत्याचार केला असं देखील ऐश्वर्या म्हणाली होती. त्यामुळे मी त्याच्यासोबत ब्रेकअप केलं आणि अभिषेकसोबत लग्नबंधनात अडकले.
पुढे ऐश्वर्या म्हणाली की सलमानसोबत रिलेशनमध्ये असतान, मी कामावर असं जायचे जसं काही घडलंच नाही. जेव्हा मी सलमान खानचे फोन उचलण्याचं बंद केलं तेव्हा (audience)सलमानने मला मारहाण करायला सुरुवात केली आणि शारीरिक दुखापत केली. आणि म्हणूनच मी कोणत्याही स्वाभिमानी स्त्री प्रमाणे त्याच्यासोबतचे सगळे संबध तोडलं. आमचं नातं याचमुळे तुटलं, असं तिने सांगितलं.त्यावर सलमान खानने देखील एका मुलाखतीमध्ये प्रतिक्रिया दिली. सलमान म्हणाला की,”जर मी खरंच ऐश्वर्याला मारलं असतं तर ती वाचलीच नसती. पुढे तो असंही म्हणाला की, आता त्या बाईने सांगितलंच असं तर मी काय सांगू?
हेही वाचा :
थंडी परतणार! येत्या 24 तासात महाराष्ट्रातील वातावरण बदलणार
एक नाही तर तब्बल 9 आयपीओ खुले होणार; पुढील आठवड्यात कमाईची मोठी संधी!
‘विरोधी पक्षाचा पूर्ण सफाया, ६५ वर्षांत असं कधीच घडलं नाही…’, मविआ नेत्याचे सूचक वक्तव्य