महाराष्ट्रातील राज्यस्तरीय स्पर्धांसाठी देणार एक कोटींचा निधी; अजित पवार यांची मोठी घोषणा

बारामती : गणेश वंदना, ढोलताशा पथक, ‘लेझर शो’, महाराष्ट्रीयन संस्कृतीचे दर्शन घडविणारे लोकसंगीत, लक्ष्यवेधी हीप हॉप नृत्य फटाक्यांची आतषबाजी आणि प्रेक्षकांनी भरगच्च भरलेले मैदान अशा अतिशय दिमाखदार, जोशपूर्ण व क्रीडामय वातावरणात २३ व्या छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे उपमुख्यमंत्री(political news todays) तथा महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा, कै. भाई नेरुरकर चषक राज्यस्तरीय खो-खो स्पर्धा, छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा आणि स्व. खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धांच्या आयोजनाकरीता राज्य शासनाकडून ७५ लाख रुपयाचा निधी देण्यात येतो; खेळाडूंना चांगल्यापद्धतीने खेळ खेळता यावा, खेळाडूंना सर्व प्रकारच्या दर्जेदार पायाभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात, याकरीता यापुढे या स्पर्धांच्या आयोजनकरीता राज्यशासनातर्फे १ कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री(political news todays) अजित पवार यांनी केली.

क्रीडा व युवक सेवा संचालनालय आणि महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यावेळी कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे, पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, खासदार सुनेत्रा पवार, खासदार सुप्रिया सुळे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर, जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे, महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचे सरकार्यवाह बाबुराव चांदोरे, पुणे जिल्हा कबड्डी संघटनेचे प्रतिनिधी, क्रीडाप्रेमी यावेळी आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या स्पर्धेला शुभेच्छा दिल्या आहेत, असे सांगून अजित पवार म्हणाले, कुठलाही खेळ हा महत्वाचा आहे, कोणताही खेळ हा खिळाडूवृत्तीने खेळला गेला पाहिजे प्रत्येकाच्या अंगात खिळाडूवृत्ती असली पाहिजे. यावर्षीच्या स्पर्धेत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे विविध खेळाडू सहभागी झाले आहेत, या स्पर्धेतील विजेत्या, उपविजेत्या खेळाडूंना 45 लाख रुपयांची बक्षिसे देण्यात येणार आहे, चांगल्या खेळाडूंचा सहभाग, भरीव आर्थिक तरतूद, बक्षिसांची मोठी रक्कम, बारामतीतील अनुकूल वातावरण, क्रीडा रसिकांचा भक्कम पाठिंबा याबळावर ही स्पर्धा यशस्वी होईल, क्रीडारसिकांच्या डोळ्याचे पारणे फेडण्याचे काम खेळाडू करतील.

देशी खेळाची लोकप्रियता वाढविण्याकरीता प्रयत्न करण्यात येत असून, क्रीडा क्षेत्रात पायाभूत सुविधा उभारण्याचे काम राज्यशासनाच्यावतीने करण्यात येत आहे, आगामी काळात क्रीडा विभागाला अधिकचा निधी देण्यात येईल. यामुळे देशी खेळांच्या प्रचार-प्रसार आणि खेळाडूंच्या विकासाला अधिक बळ मिळणार आहे.

वैभवशाली इतिहासाचा साक्षीदार असणारी बारामतीत छत्रपती शहाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या बारामतीत खो-खो, कबड्डी, क्रिकेट या स्पर्धासह मॅरेथॉन या सारख्या स्पर्धा होत असतात. यावर्षीच्या छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा आयोजनाची संधी बारामती तालुक्याला मिळाली आहे.

बारामतीचा चेहरा मोहरा बदल्याचे काम करतांना गावाचे गावपण टिकवून येथील नागरिकांचे राहणीमान अधिक उंचविण्याकरीता प्रयत्न करण्यात येत आहे. याकरिता बारामती सुदंर, स्मार्ट करण्याकरिता नागरिकांनी साथ दिली आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे, असेही अजित पवार यांनी सांगितले.

हेही वाचा :

अखेर उद्या Hyundai Creta Electric होणार लाँच

श्रद्धा कपूर बनणार ‘नागिन’, चित्रपटासंदर्भात मोठी अपडेट

हिवाळ्यात फायदेशीर ठरतील मिश्र धान्याचे लाडू; जाणून घ्या सोपी Recipe