शपथविधिला काही तास बाकी असताना अजित पवारांचं मोठं स्टेटमेंट, चर्चांना उधाण!

महाराष्ट्राला अखेर 12 दिवसांनी नवा मख्यमंत्री(current political news) मिळणार आहे. मुंबईच्या आझाद मैदानात मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी संपन्न होणार आहे. दरम्यान, आज फक्त तिघं नेते शपथ घेणार असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र, आता शपथविधीला अवघे काही तास बाकी असताना अजित पवार यांनी एक मोठं स्टेटमेंट दिलं आहे, ज्यामुळे राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आलं आहे.

आज राज्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा दिवस आहे. कारण आजपासून महाराष्ट्रात(current political news) देवेंद्र पर्वाला सुरुवात होणार आहे. आज भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेणार आहेत. दरम्यान, शपथविधीला अवघे काहीच तास बाकी असताना अजित पवार यांनी एक वक्तव्य केलं आहे, ज्याची सगळीकडे चर्चा सुरु आहे.

समोर आलेल्या माहितीनूसार, अजित पवार म्हणाले की, सगळ्यांचा शपथविधी आजच (05 डिसेंबर) होणार आहे. मात्र, हरियाणा, आंध्रप्रदेशमध्ये सगळ्यांचा शपथविधी एकत्रितच झाला होता. अजित पवारांच्या या स्टेटमेंटवरुन महायुतीत शपथविधी सोहळ्यावरुन एकवाक्यता नसल्याचं दिसून येतंय. काल राज्यपालांकडे सरकार स्थापनेचा दावा करताना त्यानंतर पत्रकार परिषदेत महायुतीमध्ये सर्व काही परस्पर सहमतीने, विश्वासाने होत असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न झाला.

येत्या 11 डिसेंबर 2024 रोजी फडणवीस सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचं सांगितलं जात आहे. तसेच या मंत्रिमंडळ विस्तारावेळी तब्बल 33 जणांचा शपथविधी होणार असल्याची माहिती मिळाली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 8 नेते, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे 10 नेते आणि भाजपचे 15 नेते मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचं समजत आहे. त्यामुळे आता या आकडेवारीनुसार फडणवीसांच्या नवीन मंत्रीमंडळात दोन उपमुख्यमंत्र्यांसह 33 जणांचा समावेश असणार असल्याचं म्हंटलं जात आहे

हेही वाचा :

अभिनय सोडल्याच्या बातम्यांदरम्यान विक्रांत मेस्सी शूटिंगसाठी सज्ज?

मोठी बातमी ! शपथविधीपूर्वी देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांना फोन

मोदी सरकारची सर्वात मोठी Digital Strike! 59 हजार व्हॉट्सॲप अकाउंट्स केले Block