अजित पवारांनी सना मलिक यांना दिली महत्त्वाची जबाबदारी: राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्तेपदी नियुक्ती
आगामी विधानसभा निवडणुकीच्या (election)पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलेले असताना, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेत नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) प्रवक्तेपदाची जबाबदारी सोपवली आहे.
अजित पवार यांच्या जनसंवाद यात्रेचा दौरा आज नवाब मलिक यांच्या मतदारसंघात पोहोचला. या दौऱ्यात नवाब मलिक यांनी अजित पवार यांचे जोरदार स्वागत केले आणि त्यांच्यासोबत एका गाडीतून प्रवासही केला. यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांना महायुतीत सामील करण्यास विरोध दर्शवला होता, परंतु आता नवाब मलिक आणि अजित पवार यांच्यातील राजकीय संबंध दृढ झाल्याचे दिसत आहे.
सना मलिक यांची प्रवक्तेपदी नियुक्ती झाल्यानंतर अजित पवार म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासमोर मी जाहीर करतो की, सना मलिक या आजपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवक्त्या असतील.” यामुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सना मलिक यांची भूमिका अधिक प्रभावी ठरणार आहे.
हेही वाचा :
मानसिक आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी दररोज १० मिनिटे ‘या’ योगासनांचा करा सराव, तणावाची होईल सुट्टी..!
पेणच्या गणेशमूर्तींनी केला २६ हजारांचा परदेश वारीचा विक्रम
कोल्ड कॉफीचे सेवन करताना सावधगिरी बाळगा: अतिसेवनाचे दुष्परिणाम आणि तज्ज्ञांचे उपाय