महाविकास आघाडीचा अजित पवारांना दे धक्का; माजी आमदार शरद पवार गटाच्या वाटेवर
पुणे: पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात (political news)नेहमीच कुटील डावपेच खेळणारे माजी आमदार विलास लांडे यांनी पुन्हा एकदा राजकीय बुद्धिबळाचा पट मांडला आहे. आगामी विधानसभेसाठी नाराज आणि इच्छुकांची जमवाजमव करत लांडे यांनी सोमवारी थेट पुणे ते मोदी बाग असा मार्ग पत्करला.
त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे(political news) राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांची भेट घेऊन शहरातील आगामी राजकीय परिस्थिती आणि योजनांबाबत चर्चा केली. येत्या ३ ऑक्टोबरला घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर विलास लांडे भोसरी मतदारसंघात तुतारी (तुतारी) फुंकतील. त्यामुळे भोसरी विधानसभा मतदारसंघात महायुतीचा मार्ग अवघड बनल्याचे चित्र आहे.
दोन दिवसांपूर्वी अजित पवार यांच्या पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी पत्रकार परिषद घेऊन चिंचवडच्या जागेवर नवा चेहरा उतरविला जाणार असून, पराभूत उमेदवारांना पुन्हा तिकीट दिले जाणार नाही, असे सांगितले होते.
यामध्ये माजी स्थायी समिती सभापती प्रशांत शितोळे, माजी नगरसेवक मयुरेशर भोंडवे, मयूर कलाटे यांचा समावेश होता. दरम्यान, माजी आमदार विलास लांडे यांनी या सर्व संतप्त लोकांना एकत्र करत सोमवारी मोदी बागेचा रस्ता धरला. यावेळी लांडे यांच्यासह प्रशांत शितोळे, मयुरेशर भोंडवे, मयूर कलाटे, विनोद नधे, योगेश ढगे हेदेखील तिथे उपस्थित होते. हा व्हिडिओ शहरांमध्ये व्हायरल झाल्यानंतर लांडे यांच्या राजकीय रणनीतीची जोरदार चर्चा झाली.
येत्या काही दिवसांत विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. विविध घडामोडींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर विलास लांडे 3 ऑक्टोबरला शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे भोसरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी-शरदचंद्र पवार यांच्या रणशिंगाचा प्रतिध्वनी ऐकू येणार असल्याची चर्चा आहे.
हेही वाचा :
किमान 3 दिवस रुग्णालयातच राहणार रजनीकांत
iPhone 16 वर रिलायन्सकडून बंपर ऑफर; मिळणार तब्बल ‘इतक्या’ हजारांचं डिस्काऊंट
राज्य सरकार लाडक्या बहिणींना विकत घेणार का?; काँग्रेसच्या महिला खासदाराचा थेट सवाल