‘आरोपचं xxxच काढून टाकलं पाहिजे’; बदलापूर प्रकरणावरुन अजित पवारांचा जाहीर सभेत संताप

बदलापूर प्रकरणावरून अजित पवार यांनी संताप व्यक्त केलाय. विकृत माणसाचा कायमचा(meeting) बंदोबस्त केल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याची ग्वाही अजित पवार यांनी यवतमाळ मधील लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमात दिली. बदलापूर प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपी फाशीची शिक्षा द्या, अशी मागणीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलीय.

‘जो चुकीचं वागेल त्याला शासन झालंच पाहिजे, तो कितीही मोठ्या बापाचा (meeting)असूद्या किंवा कितीही मोठ्या वशिल्याचा असू द्या, त्याची फिकिर आम्ही करणार नाही. त्याला इतकं कडक शासन करणार, आमचा तर प्रयत्न सुरु आहे शक्ती कायदा दिल्लीत राष्ट्रपतींकडे गेला आहे, तो लवकर मंजूर करुन आणायचा आहे.

माझ्या तर मनात वैयक्तिक आहे, अशा प्रकारची विकृत माणसं, ज्यावेळेस आमच्या आई-बहिणीला किंवा आमच्या मुलींच्या अंगावर हात टाकतात, त्यावेळेस त्यांना पुन्हा अशा काही कायद्याचा बडगा दाखवला पाहिजे, की पुन्हा तसा विचारही त्यांच्या मनात येता कामा नये’.

‘माझ्या भाषेत सांगायचं तर त्यांचं सामानच काढून टाकलं पाहिजे, परत नाहीच. हे केलंच पाहिजे इतके नालायक काही काही लोकं आहेत, जो चुकीचं वागेल त्याला शासन झालंच पाहिजे’ असा संताप अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा :

महाराष्ट्र हादरला! पुन्हा एका मुलीवर बलात्कार

कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी शेअर मार्केट बंद राहणार का?

“पोलीस झोपेत, सरकार अडचणीत आल्यावरच विशिष्ट वकील सक्रिय” – जयंत पाटील