राष्ट्रवादीतील ‘मुन्नी’ प्रकरणावर अजितदादा भडकले, सुरेश धस यांना दिला थेट प्रत्युत्तर!
सुरेश धसांनी आरोप केलेली राष्ट्रवादीतील ‘मुन्नी’ कोण असा प्रश्न विचारताच उपमुख्यमंत्री (Ajit Pawar)अजित पवार चांगलेच संतापले. ज्यांनी हा मुद्दा काढलाय त्यांनाच विचारा असं सांगत अजित पवारांनी आपला संताप व्यक्त केला.
अमोल मिटकरींनी सुरेश धसांवर आरोप केल्यानंतर धसांनी राष्ट्रवादीतील मुन्नीची सुन्नी करणार असं वक्तव्य केलं होतं. त्यावर राष्ट्रवादीतील ही मुन्नी कोण असा प्रश्न (Ajit Pawar)अजित पवारांना विचारण्यात आला.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा एक महिना पूर्ण झाला आहे. त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी यावर भाष्य केलं. या प्रकरणातील कोणत्याही आरोपीला सोडणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी आधीच जाहीर केलंय. त्यामुळे पक्ष वगैरे न पाहता कोणताही वरिष्ठ नेता यात दोषी असेल तर त्याच्यावर कारवाई करणार असं आश्वासन अजित पवारांनी दिलं.
भाजपचे आमदार सुरेश धस यांनी बीड प्रकरणात धनंजय मुंडे आणि त्यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यावर आरोप केले. अजित पवारांवरही त्यांनी भाष्य केलं होतं. त्यानंतर राष्ट्रवादीचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी सुरेश धस यांच्यावर आरोप केले.
धस यांनीच जमिनी लाटल्या, खंडणी गोळा केल्याचा आरोप मिटकरी यांनी केला. त्याचसोबत राष्ट्रवादीचे सूरज चव्हाण यांनीही सुरेश धस यांच्यावर आरोप केला होता.
मिटकरींच्या आरोपावर सुरेश धस यांनी प्रत्युत्तर दिलं. मिटकरी किंवा सूरज चव्हाण हे लहाण मासे आहेत. त्यांना राष्ट्रवादीतील एक मुन्नी आरोप करायला सांगत आहे. त्या मुन्नीची मी सून्नी करणार असं धस यांनी म्हटलं होतं.
सुरेश धस यांनी केलेल्या आरोपानंतर राष्ट्रवादीतील मु्न्नी कोण असं अजित पवारांना विचारल्यानंतर ते चांगलेच भडकल्याचं दिसून आलं. ज्यांनी हा मुद्दा उपस्थित केलाय त्यांनाच विचारा असंही ते म्हणाले.
बीड प्रकरणात राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी केली जात आहे. त्यावर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, या प्रकरणात सीआयडी, एसआयडी चौकशी सुरू आहे. न्यायालयातही हा प्रश्न आहे. यामध्ये धनंजय मुंडे जर दोषी सापडले तर त्यांच्यावर कारवाई करणार.
बीड प्रकरणात प्रत्येकाची चौकशी करून, आरोपींचा सीडीआर तपासून कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती अजित पवारांनी दिली. राज्यात अशा प्रकारची घटना आजिबात खपवून घेणार नाही.
विरोधी पक्षातल्या आणि सत्ताधारी काही नेत्यांनीही काय बोलायचं हा त्यांचा अधिकार आहे. मात्र यामध्ये कुणावरही अन्याय होऊ नये अशी आपली भूमिका आहे असं अजित पवारांनी स्पष्ट केलं.
बीड प्रकरणात जे नेते आरोप करत आहेत त्यांनी त्यांच्याकडील पुरावे एसआयडी आणि सीआयडीकडे द्यावे. पुराव्याशिवाय कुणावरही आरोप करणं चुकीचं आहे.
यात राजकारण आणू दिलं जाणार नाही, कुणालाही पाठीशी घालणार नाही. फक्त या संबधित पुरावे सापडले तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची भूमिका राज्य सरकारची आहे असं अजित पवार म्हणाले.
हेही वाचा :
मोठी बातमी! आदित्य ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, नेमकं कारण…
मुख्यमंत्र्यांसोबत आदित्य ठाकरे, पण मुद्दा शिंदेंच्या खात्याचा; चर्चांना उधाण!
आ बैल मुझे मार! स्वतःच मृत्यूला दिले आमंत्रण, सापांच्या घोळक्यात उडी मारताच घडले असे… Video Viral