सतर्क! आज राज्यातील 5 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी
महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कमी झाला आहे. (alert)तर काही भागात अजूनही मुसळधार पाऊस सुरू आहे. अशातच आता हवामान खात्याने आज काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. हवामान खात्याने आज राज्यातील पाच जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, कोकणातील रायगड, पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि विदर्भातील यवतमाळ, वर्धा आणि अमरावती या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे या जिल्ह्यांतील नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
गेल्या महिन्यात राज्यातील सर्वच भागात जोरदार पाऊस पडल्याने पाण्याची चिंता बऱ्यापैकी मिटलेली दिसून येत आहे. तसेच पुणे शहरी भागात गेल्या दोन दिवसांपासून (alert)पावसाचा जोर कमी झाला असला तरी त्यापूर्वीच येथे जोरदार पाऊस झाला आहे. त्यामुळे पुणेकरांचा पाण्याचा प्रश्न आता सुटला आहे.पुणे- पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणात ७.९७ टीएमसी ९३.६४ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. पुणे जिल्ह्यातील इतर धरणांपैकी कलमोडी, आंध्रा, भाटघर आणि उजनी ही धरणे 100 टक्के भरली असून या धरणांमधून पाणी सोडण्यात येत आहे. याशिवाय पेडगाव, डिंबे, चासकमान, भामा आसखेड, वाडीवळे, कासारसाई, गुंजवणी, नीरा देवघर, वीर ही धरणेही काठोकाठ भरल्याचे जलसंपदा विभागाने म्हटले आहे.
याशिवाय मुंबईला पाणीपुरवठा करणारी (alert)चारही धरणे भरली आहेत. अशा स्थितीत मुंबईकरांची वर्षभराची पाण्याची चिंता संपली आहे. अतिवृष्टीमुळे ओव्हरफ्लो झालेल्या चार धरणांमध्ये तानसा धरण, मोडकसागर धरण, भातसा धरण आणि वैतरणा धरणाचा समावेश आहे.
हेही वाचा:
विनेश फोगटचा कुस्तीला अलविदा: “माँ कुश्ती मेरे से जीत गई, मैं हार गई”
वजन वाढवण्याची भीती न करता पांढरे लोणी खा: याचे आरोग्यदायी फायदे जाणून घ्या
शक्तिपीठ महामार्ग विरोधात राज्यव्यापी आंदोलनाची पुन्हा सुरुवात