भन्नाट ऑफर! HP चा लॅपटॉप मिळतोय फक्त 10 हजारात, खरेदीची सुवर्ण संधी
जर तुम्ही कमी किमतीत एखादा चांगला लॅपटॉप(laptop) घेण्याच्या शोधात असाल, तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी चालून आली आहे. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Flipkart वर HP चा लॅपटॉप खूपच कमी किमतीत उपलब्ध आहे. तुम्ही HP Chromebook ला त्याच्या मूळ किमतीपेक्षाही निम्म्या किमतीत खरेदी करू शकता. एचपीच्या या लॅपटॉपला तब्बल ७० टक्के सवलतीसह अवघ्या १० हजारांच्या बजेटमध्ये खरेदी करता येईल.
ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Flipkart वर HP Chromebook MediaTek MT8183 तब्बल ७० टक्के सवलतीत उपलब्ध आहे. या लॅपटॉपची(laptop) मूळ किंमत ३७,२४१ रुपये आहे. परंतु, भरघोस सवलतीनंतर हा लॅपटॉप फक्त १०,९९९ रुपयांमध्ये तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता. याशिवाय, Flipkart Axis Bank Credit Card द्वारे पेमेंट केल्यास ५ टक्के अतिरिक्त कॅशबॅकचा देखील लाभ मिळेल. अशाप्रकारे, तुम्ही हा लॅपटॉप अवघ्या १० हजारांच्या बजेटमध्ये खरेदी करू शकता.
एचपी क्रोमबुकमध्ये ११.६ इंचाचा मोठा एचडी डिस्प्ले देण्यात आला असून, त्याची ब्राइटनेस २२० नीट्स इतकी आहे. यामध्ये अँटी-ग्लेयर स्क्रीन देण्यात आली आहे. तसेच, यात बिल्ट-इन स्पीकर आणि मायक्रोफोन देण्यात आले आहेत. कनेक्टिव्हिटीसाठी यात ४ यूएसबी पोर्ट्स देखील मिळतात.
हा लॅपटॉप MediaTek MT8183 प्रोसेसरवर चालतो. यामध्ये ४ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेज देण्यात आले आहे. हा लॅपटॉप ChromeOS वर चालतो. तसेच, लॅपटॉपच्या खरेदीवर तुम्हाला १ वर्षाची वॉरंटी देखील मिळते.
हेही वाचा :
महाराष्ट्र हादरलं! आई-वडिलांनीच मुलीला साखळदंडात डांबून ठेवलं, समाजात खळबळ
ऐश्वर्या राय बच्चनची लेक आराध्याची दिल्ली उच्च न्यायालयात धाव
शिक्षक विद्यार्थीच्या नात्याला काळीमा! VIDEO पाहून तुमच्याही तळपायाची आग मस्तकात जाईल