अंबानींच्या धाकट्या सुनेचा मित्राच्या लग्नातील ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

गेल्या वर्षी उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी विवाहबंधनात अडकला. 12 जुलै 2024 रोजी अनंत अंबानीने राधिका मर्चंटशी लग्न केले. एन्कोर हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेडचे सीईओ वीरेन मर्चंट आणि उद्योजिका शैला मर्चंट यांची कन्या राधिका मर्चंट आता अंबानी कुटुंबाची धाकटी सून आहे(video).

लग्नानंतर राधिका आणि अनंत अनेक ठिकाणी एकत्र दिसतात. नुकतेच, अनंत अंबानी पत्नी राधिका मर्चंटसह एका खास मित्राच्या संगीत सोहळ्याला उपस्थित होते. यावेळी अनंत आणि राधिका थिरकताना दिसले. त्यांचे हे व्हिडिओ(video) सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
व्हायरल व्हिडिओमध्ये राधिका मर्चंट मैत्रिणींबरोबर ‘हाउसफुल्ल 2’ चित्रपटातील ‘अनारकली डिस्को चली’ गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. यावेळी राधिकाच्या अंदाजाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. या संगीत सोहळ्यासाठी तिने शिमरी सिल्व्हर रंगाचा लेहंगा परिधान केला होता.
दुसऱ्या व्हिडिओत अनंत अंबानी आपल्या मित्रांबरोबर डान्स करताना दिसत आहे. ‘शूट आउट एट लोखंडवाला’ चित्रपटातील ‘उनके नशे में’ या गाण्यावर अनंत मित्रांबरोबर थिरकताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेता वीर पहारियासुद्धा दिसत आहे.
राधिका आणि अनंत अंबानीचा हा डान्स व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. या व्हिडिओला चाहत्यांकडून खूप प्रेम मिळत आहे. तसेच अनेक प्रतिक्रिया देखील उमटत आहेत.
हेही वाचा :
अलमट्टी धरणाच्या उंचीवाढीवरून विशाल पाटलांचे गंभीर आरोप; महाराष्ट्राच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
वाहनधारकांसाठी मोठी बातमी! टोलचं झंझट कायमचं मिटणार
‘मेरी शर्ट छोड दो, मम्मी डाटेंगी’, आईची एवढी भिती की वाघाला केली विनवणी; चिमुकल्याचा Video Viral