सत्ता स्थापनेबाबत अमित ठाकरेंचं मोठं वक्तव्य, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मुंबईमधील माहीम मतदारसंघावर यावेळी सर्वांची नजर असणार आहे. येथे यंदा तिरंगी लढत होणार आहे. माहीममधून मनसेकडून अमित ठाकरे, शिवसेना शिंदे गटाकडून सदा सरवणकर आणि शिवसेना ठाकरे गटाकडून महेश सावंत निवडणुकीच्या रिंगणात(political circles) आहे. आज राज्यभरात मतदान पार पडते आहे.
आज सकाळी 9 वाजेपर्यंत माहीम विधानसभा मतदारसंघात 8.14 टक्के मतदान झालं. मनसेचे उमेदवार अमित ठाकरे यांनी देखील सकाळीच मतदानाचा हक्क बजावला. राज ठाकरे, शर्मिला ठाकरे यांनी देखील मतदान केलं. यावेळी अमित ठाकरेंनी माहीम-दादरमधील नागरिकांनी जास्तीत जास्त मतदान करावं, असं आवाहन देखील केलं.
यावेळी अमित ठाकरे यांनी सत्ता स्थापनेबाबतही मोठा दावा केला. मी दाव्याने सांगतो, मनसेशिवाय राज्यात सत्ता स्थापन होणार नाही, असं अमित ठाकरे म्हणाले. मतदान केल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. मी लोकांपर्यंत पोहचलो आहे. मी डोअर टू डोअर प्रचार केलाय. मला जे करायचं आहे ते मी लोकांपर्यंत पोहोचवलं आहे, असंही अमित ठाकरे म्हणाले.
दरम्यान, मतदान करण्यापूर्वी अमित ठाकरे(political circles) आणि सदा सरवणकर यांनी सिद्धिविनायक मंदीरात जाणून दर्शन घेतले. यावेळी दोघांचीही भेट झाली. दोघांनी हस्तांदोलन देखील केलं आणि एकमेकांना शुभेच्छाही दिल्या. माहीम येथे आता कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.
प्रचारकाळात मनसे आणि सदा सरवणकर यांच्यामध्ये चांगलाच शाब्दिक वाद झाला होता. मात्र आज दोन्ही उमेदवारांनी सिद्धीविनायकाचं दर्शन घेतल्यानंतर परस्परांशी हस्तांदोलन केलं. उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार महेश सावंत यांनी देखील सिद्धीविनायकाचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांनीही माध्यमांशी संवाद साधला.
“दादरचे मतदार हे विचारपूर्वक मतदान करतात. इथे कोणाच्या ओघात, प्रेमाखातर जात नाही. जो खरोखर काम करतो, जो उपलब्ध असतो, लोकांची सेवा करतो त्याला लोक निवडतात.”, असं महेश सावंत म्हणाले आहेत.
हेही वाचा :
भाजप अन् काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा
सर्वात मोठी बातमी! महाराष्ट्रातील ‘या’ गावात अद्याप एकही मतदान नाही