अमित ठाकरे भाजपच्या कोट्यातून राज्यपाल नियुक्त आमदार होण्याची शक्यता

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मनसे अध्यक्ष राज ठाकरे(current political news) यांच्याकडे भेटीसाठी दाखल झाले आहेत. या भेटीसंदर्भात सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना राज्यपाल नामनियुक्त आमदार म्हणून विधानपरिषदेवर पाठवण्याची शक्यता आहे.

भाजपच्या कोट्यातून अमित ठाकरे(current political news) यांना विधानपरिषदेवर पाठवण्यात येण्याची शक्यता आहे. या शिवाय आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मनसे आणि भाजप युती होण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे. सध्या राज्यपाल नियुक्त आमदारांच्या एकूण 12 जागांपैकी 5 जागा रिक्त आहेत.
भाजपच्या कोट्यातून राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून अमित ठाकरेंना घेतलं जाण्याची शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजप मनसेची साथ घेणार असल्याची माहिती आहे. त्यामुळं भाजप काही जागा मनसेला सोडू शकतं, अशी माहिती आहे. अमित ठाकरे यांना विधानपरिषदेवर आमदार करुन भाजप आणि मनसेच्या मैत्रीचा नवा अंक सुरु होणार का ते पाहावं लागेल.
अमित ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक माहीम विधानसभा मतदारसंघातून लढवली होती. माहीममध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. माहीमची निवडणूक तिरंगी झाली होती. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे महेश सावंत यांनी सदा सरवणकर आणि अमित ठाकरे यांचा पराभव केला होता.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी दाखल झाले होते. मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस विराजमान झाल्यानंतर पहिलीच भेट होती. मुख्यमंत्री सकाळी 11 वाजता महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट ॲंड गाईड हाॅलमधील शिवाजी पार्कमध्ये परीक्षा पे चर्चा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. त्यापूर्वीच्या भेटीमुळं राजकीय क्षेत्रात चर्चांना उधाण आलं आहे.
राज्यपाल नामनिर्देशित कोट्यातून सध्या भाजपच्या चित्रा वाघ, विक्रांत पाटील, बाबूसिंग महाराज राठोड, शिवसेनेचे हेमंत पाटील, मनीषा कायंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पंकज भुजबळ, इद्रिस नायकवडी विधानपरिषदेवर आमदार आहेत. 12 पैकी 5 जागा रिक्त असून या जागेवर महायुती कुणाला संधी देतं ते पाहावं लागेल.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मनसे आणि भाजप यांच्यात युती देखील होण्याची शक्यता आहे. राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात आज सव्वा तास बैठक पार पडली. या बैठकीतून भाजप मनसेच्या नव्या मैत्रीचं पर्व सुरु होणार का ते पाहावं लागेल.
हेही वाचा :
असा बॉयफ्रेंड नको गं बाई! आधी प्रपोज केले अन् नंतर…; Video Viral
एसटी कर्मचाऱ्यांसाठी नवीन नियम, महामंडळाचं कडक परिपत्रक जारी
‘…म्हणून लहान मुलांमधील राग वाढतोय’; पालकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी