अमोल कोल्हेंनी केले शरद पवार यांचे पाद्यपूजन; गुरुपौर्णिमा विशेष व्हिडिओ आला समोर

जुन्नर : आज गुरुपौर्णिमा असल्यामुळे सर्वत्र उत्साह दिसून येत आहे. अनेकांनी आपापल्या गुरुजनांची(video) भेट घेत त्यांचे आशीर्वाद घेतले आहेत. तसेच देवांचे दर्शन घेतले आहे. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर विविध ठिकाणी गुरु भेटत असतात. तसेच जुन्नरचे खासदार अमोल कोल्हे यांनी राजकारणामधील गुरु म्हणून जेष्ठ नेते शरद पवार यांचे आशीर्वाद घेतले आहे. पाद्यपूजन केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.

राजकारणातील(video) चाणक्य अशी ओळख निर्माण करणारे जेष्ठ नेते शरद पवार यांचे पूजन अमोल कोल्हे यांनी केले आहे. आज गुरुपौर्णिमा असल्यामुळे त्यांनी शरद पवार यांचे पाद्यपूजन केले आहे. शरद पवार हे आज जुन्नर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी अमोल कोल्हे यांच्या निवासस्थानी भेट दिली.
यावेळी अमोल कोल्हे यांनी त्यांचे पूजन केले. औक्षण करत घरामध्ये शरद पवार यांचे स्वागत केले. तसेच पाण्याने पाय धुवून पूजन केले. राजकारणातील गुरु अर्थात मार्गदर्शक म्हणून अमोल कोल्हे यांनी हे पूजन केले. तसेच कृतज्ञता व्यक्त केली. आपल्या ऑफिशियल अकाऊंटवरुन सोशल मीडियावर अमोल कोल्हे यांनी व्हिडिओ शेअर केली आहे.

नेटकऱ्यांना त्यांची ही कृती अत्यंत भावली आहे. सोशल मीडियावर अमोल कोल्हे यांचे कौतुक केले जात आहे. पोस्ट शेअर करताना अमोल कोल्हे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी लिहिले आहे की, विठूरायाच्या भेटीसाठी व्याकुळलेल्या भक्तास जणू भगवंताने घरी येऊन दर्शन द्यावे” असं सुख आज मी अनुभवतोय…!
ज्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करण्याचा माझा नेहमीच प्रयत्न असतो त्या आदरणीय पवार साहेबांचे आज निवासस्थानी स्वागत करताना जीवन धन्य झाल्याचा आनंद मिळाला. या चंद्राच्या सानिध्यात आजन्म “ध्रुवतारा” बनून राहण्याचे भाग्य मला मिळावे हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना, अशा भावना खासदार अमोल कोल्हे यांनी व्यक्त केल्या आहेत.
हेही वाचा :
आम्ही चित्रपट काढले तर तुम्हाला तोंड लपवत फिरावं लागेल; संजय राऊतांचा मुख्यमंत्री शिंदेवर प्रहार
बॉयफ्रेंडसोबत बोलता बोलता ट्रेनखाली आली महिला, अंगावरून ट्रेन गेली अन् …Video
पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ; २ राष्ट्रीय महामार्ग, ७ राज्यमार्ग वाहतूकीसाठी बंद