भाजपकडून अजितदादा गटाची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न?, ‘या’ नेत्याला केंद्रात मिळाली मोठी जबाबदारी
लोकसभेनंतर राज्यात आता लवकरच विधानसभा(political) निवडणुका होणार आहेत. त्यामुळे सर्वांना आता विधानसभेचे वेध लागले आहे. महायुतीसह महाविकास आघाडी निवडणुकीसाठी जोरदार तयारीला लागली आहे. मात्र, त्यापूर्वीच महायुतीमधील अंतर्गत कलह आता समोर येत आहे. गेल्या काही दिवसांपासून उमेदवारी आणि जागा वाटपवरून महायुतीमधील संघर्ष चव्हाट्यावर आल्याचं दिसून येतंय.
राजकीय (political) वर्तुळात तर जागावाटपापूर्वीच अजित पवार यांनी महायुतीमधून बाहेर पडावे, यासाठी भाजप आणि शिंदे गटाकडून पद्धतशीर प्रयत्न सुरू असल्याची देखील जोरदार चर्चा आहे. भाजप आणि शिंदे गट जाणीवपूर्वक अजितदादा गटाची कोंडी करत आहे. जेणेकरुन अजितदादा स्वतःच युतीतून बाहेर पडतील, अशी चर्चा सध्या रंगत आहे. यातच एक मोठी बातमी समोर आली आहे.
शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांना सिडको तर भरत गोगावले यांना एसटी महामंडळाचे अध्यक्षपद देण्यात आले होते. निवडणुकीच्या तोंडावर महामंडळाचे अध्यक्षपद देऊन त्यांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न करण्यात आले. यात अजितदादा गटातील आमदारांना काहीच न मिळाल्याने अजित पवार गट नाराज असल्याची चर्चा होती.
अशात अजित पवार यांचे विश्वासू सहकारी सुनील तटकरे यांना केंद्रात एक महत्त्वाची जबाबदारी मिळाली आहे. त्यांची केंद्र सरकारच्या पेट्रोलियम आणि नॅचरल गॅस कमिटीच्या चेअरमनपदी वर्णी लागली आहे.या समितिमध्ये एकूण 31 सदस्य असतात. यापैकी 21 लोकसभा आणि 10 राज्यसभेचे सदस्य असतात.
पेट्रोलियम आणि नॅचरल गॅस संबंधित विषय सभागृहात चर्चेला येणार असेल, तेव्हा ही समिती त्याबाबत तपासणी करून अहवाल तयार करते. या महत्वाच्या समितीवर अजित पवार गटातील नेत्याची वर्णी लागली आहे. यातून अजितदादा गटाची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.
दुसरीकडे अजित पवार यांनी एका मुलाखतीत पु्न्हा एकदा मुख्यमंत्रीपदाबाबतची मनातील सल बोलून दाखवली आहे. “मुख्यमंत्री बनायचं आहे. पण आमची गाडी तिथेच उपमुख्यमंत्रीपदावर अडकली आहे, त्याला काय करायचं. मी पुढे जाण्याचा प्रयत्न करतो, पण संधी मिळत नाही.”, असं अजितदादा यांनी बोलून दाखवलं आहे.
हेही वाचा:
आज शिवयोगात ‘या’ राशींचं भाग्य फळफळणार, सर्व गोष्टीत यश मिळणार!
मोठी बातमी! मंत्री छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, रूग्णालयात दाखल
लाडक्या बहीणींसाठी गुड न्यूज, योजनेसाठी अर्ज करण्यास मिळणार मुदतवाढ?