पुन्हा ठाकरेंविरोधात राग! सोडून गेलेल्या माजी नगरसेवकांकडून पक्षनेतृत्वाला दोष
ठाकरेंच्या शिवसेनेला रामराम करणाऱ्या(leadership) माजी नगरसेवकांनी पुन्हा एकदा पक्षनेतृत्वालाच दाेष दिला आहे. काॅंग्रेस साेबत गेल्याने लाेकांमध्ये नकारात्मक भावना निर्माण झाल्याचे या माजी नगरसेवकांनी स्पष्ट केले. तसेच संजय राऊत यांचे नाव न घेता, त्यांचा ‘सकाळचा भाेंगा’ असा उल्लेख त्यांनी केला. त्याचवेळी या माजी नगरसेवकांच्या विराेधात भाजपमधील इच्छुकांनी बॅनरबाजी सुरु केली आहे.
ठाकरेंच्या शिवसेनेचे (leadership)बाळा ओसवाल, संगिता ठाेसर, विशाल धनवडे, पल्लवी जावळे, प्राची आल्हाट या पाच नगरसेवकांनी नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे त्यांच्या प्रभागातील भाजपचे इच्छुक कार्यकर्ते नाराज झाले आहे. यासंदर्भात दै. नवराष्ट्रने वृत्त प्रसिद्ध केले हाेते.
या पाच नगरसेवकांनी गुरुवारी आपली भुमिका पत्रकार परीषदेत मांडताना पुन्हा एकदा पक्ष नेतृत्वावरच टिका केली, त्याचवेळी ठाकरेंची शिवसेना ही खरी आहे, असा दावाही केला. यावेळी भाजपचे सरचिटणीस पुनीत जोशी, शहर उपाध्यक्ष राजाभाऊ शेंडगे, पुष्कर तुळजापूरकर यावेळी उपस्थित होते.
खरी शिवसेना ही उद्धव ठाकरे यांचीच आहे, त्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत राहिलो होतो. पण पक्ष नेतृत्वाचे पुण्यात लक्ष नाही. रोज सकाळच्या भोंग्यामुळे शिवसेनेचे मोठे नुकसान झाले असून, लोकांमध्ये नकारात्मक भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे आम्ही भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.
आम्हाला हिंदुत्वाची चाड असल्याने आम्ही उद्धव ठाकरेंसोबत होते. पण काँग्रेससोबत शिवसेना गेल्याने आपले चुकले आहे हे लक्षात आले. रोज सकाळच्या भोंग्यामुळे शिवसेनेची प्रतिमा मलिन झाली, जावळे यांनी माझे भाजपमध्ये माझे कोणाशीही वाद नाहीत, पूर्वी मी पक्षातच होतो, पण तांत्रिक कारणामुळे मी शिवसेनेत गेलो होतो. स्वर्गीय गिरीश बापट यांच्या मार्गदर्शन होते.
या माजी नगरसेवकांच्या पक्षप्रवेशामुळे स्थानीक भाजप पदाधिकार्यांमध्ये तसेच इच्छुकांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. हे नगरसेवक ज्या मतदारसंघातील आहेत, तेथील आमदारांनाच मुळात हे प्रवेश खटकल्याचे कार्यकर्ते जाहीरपणे बोलू लागले आहेत.
मागील दहा वर्षात भाजपचे अनेक कार्यकर्ते तयार झाले असून स्वबळावर एकहाती महापालिकेत सत्ता आणण्याची ताकद निर्माण झाली आहे. असे असताना अगदी काही महिन्यांपू्वी पक्षाचे सर्वोच्च नेत्यांवर शारिरिक आणि खालच्या पातळीवर जाऊन टीका करणार्यांना उमेदवारी देण्यास स्थानीक कार्यकर्त्यांचा ठाम विरोध असेल, असेही हे कार्यकर्ते सांगू लागले आहेत.
आम्हाला पक्षाकडून निष्ठेचे हेच फळ मिळणार? असा सवालही हे कार्यकर्ते करु लागले आहेत. भाजपमध्ये ज्या प्रभागातून हे नगरसेवक आले आहेत, तेथे कार्यकर्त्यांकडून विरोधात थेट बॅनरबाजी सुरू झाली आहे. यामुळे भाजपच्या ताकदीपेक्षा नेत्यांची डोकेदुखी वाढल्याचे पाहायला मिळत आहे.
पुण्यातील शिवसेनेकडे नेत्याचे लक्ष नाही, वर्षानुवर्षे तेच लोक पदांवर आहेत. हिंदुत्वापासून पक्ष दूर गेल्याने आम्ही पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर उमेदवारी मिळेल अथवा मिळेल, पण आम्ही काम करू, आम्ही आलो म्हणून भाजपमधील कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही. त्यांनाही उमेदवारी मिळू शकते, असे धनवडे यांनी नमूद केले.
हेही वाचा :
CM फडणवीसांचा विवादास्पद वक्तव्य: “महाराष्ट्राला कुणी…” भुवया उंचावल्या
तीळाचे धार्मिक, सांस्कृतिक आरोग्यासाठीचे महत्त्व जाणून घ्या.
बड्या उद्योगपतीवर दीपिका पादुकोन भडकली, रविवारी कामावर सल्ला देणाऱ्याला झापलं