सांगलीत कृष्णा नदीत उडी मारून पोहणाऱ्यांची स्टंटबाजी अंगलट VIDEO
कृष्णा नदीत पाणी पातळी इशारा पातळीच्या आसपास असूनही,(river camp) हौशी तरुणांनी नवीन पुलावरून उड्या मारून पोहण्याची स्टंटबाजी केली. या स्टंटबाजीने या तरुणांना चांगलाच अनुभव आला. पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने हे तरुण वाहू लागले आणि सांगलीच्या सरकारी घाटावर असलेल्या विद्युत पोलला पकडून त्यांनी आपला जीव वाचवला.थंड पाणी आणि मोठ्या प्रवाहामुळे या तरुणांना काय करावे काहीच कळत नव्हते. कृष्णा काठावर असलेल्या नागरिकांनी ही घटना पाहून आरडाओरड सुरू केली. काही पोहणाऱ्या तरुणांनी त्वरित कृष्णा नदीत उडी घेऊन या तरुणांचा जीव वाचवला.
हा रेस्क्यूचा थरार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.कृष्णा नदीची पाणी पातळी सध्या ३८ फुटांवर आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रातील मुसळधार पावसामुळे धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. परिणामी सांगलीमध्ये पूर सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.सांगलीतील कॉलनी, सुरवंशी प्लॉट, काका नगर या भागातील पूरग्रस्त कुटुंबीयांना (river camp)महापालिकेच्या निवारा केंद्रामध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे. चांदोली धरण परिसरामध्ये सातत्याने अतिवृष्टीमुळे वारणा नदीला पूर आला असून पूल आणि बंधारे पाण्याखाली गेले आहेत. काही गावांमध्ये पाणी घुसल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
धरण प्रशासनाने वारणा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले आहे. सांगली महापालिका क्षेत्रातील १५६ कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले आहे. परिस्थिती गंभीर असल्याने नागरिकांना सुरक्षिततेसाठी सर्वतोपरी उपाययोजना करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
— Maharashtra Times (@mataonline) July 26, 2024
चांदोली धरण ८८.७३% भरले असून आत्तापर्यंत पर्यंत २२४३ मिलिमीटर पाऊस पडला असून १६,६२४ क्युसेकने या धरणात पाण्याची आवक होत आहे. तर धरणातून विद्युत ग्राहतून १३०५ आणि चार वक्र दरवाज्यातून ८८१२ असे एकूण मिळून १० हजार ११७ क्युसेकने पाणी वारणा नदी (river camp)पात्रात सोडण्यात येत आहे. वारणा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचे आवाहन धरण प्रशासन यांच्याकडून करण्यात आले आहे. गावामध्ये दवडी दिली जात आहे. तर ११ बंधारे आणि ३ पूल पाण्याखाली गेले आहेत.तर, सांगली महापालिका क्षेत्रातील एकूण १५६ कुटूंबातील ७१० लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे.
हेही वाचा :
राज्यातील युवकांसाठी खुशखबर! सर्व शासकीय कार्यालयात इंटर्नशिपची संधी उपलब्ध
जितेंद्र आव्हाड यांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल, म्हणाले, “राजकारण म्हणजे चित्रपट नव्हे…”
पत्नीची अनंत प्रतीक्षा: ‘तुला भेटायला येतो’ अशी चिठ्ठी आली, पण तो तिरंग्यात गुंडाळून आढळला