नवीन वर्षात WhatsApp चॅटिंगमध्ये अ‍ॅनिमेशनचा तडका; वापरकर्त्यांसाठी नवे अपडेट

इन्स्टंट मेसेजिंग ॲप (WhatsApp)व्हॉट्सॲप लवकरच 2025 या नवीन वर्षांच पहिल फीचर रोलआऊट करणार आहे. 2024 या संपूर्ण वर्षात व्हॉट्सॲपने त्यांच्या युजर्ससाठी नवीन आणि मजेदार फीचर्स रोलआऊट केले होते.

या फीचर्समध्ये Meta AI, स्टेटस अपडेटमध्ये टॅग आणि लाईक्स, व्हिडिओ कॉल फिल्टर्स, व्हॉइस मेसेज ट्रान्सक्रिप्शन, यूजर इंटरफेसमध्ये बदल, फेवरेट चॅट्स आणि कॉन्टैक्ट ऑर्गनाइजेशन, यांचा समावेश होता. 2024 च्या या सर्व मजेदार (WhatsApp)फीचर्सनंतर आता कंपनी लवकरत 2025 चं पहिल फीचर रोल आऊट करण्याच्या तयारीत आहे.

आता कंपनी 2025 सालचे पहिले अपडेट आणणार आहे. नवीन अपडेटमुळे आता या इन्स्टंट मेसेजिंग ॲपमध्ये चॅटिंगचा अनुभव बदलणार आहे. ॲपच्या लेटेस्ट अपडेटमध्ये यूजर्सना अनेक फीचर्स मिळणार आहेत. नवीन अपडेटमध्ये व्हॉट्सॲप आपल्या वापरकर्त्यांना चॅटिंग करताना मॅसेज ॲनिमेशन मॅनेज करण्याची सुविधा देणार आहे. या फीचरच्या मदतीने यूजर्स त्यांच्या आवडीनुसार त्यांना मेसेजमध्ये कोणत्या प्रकारचे ॲनिमेशन हवे आहे ते सेट करू शकतील.

WebetaInfo या वेबसाइटने या फीचरची माहिती दिली आहे. WebetaInfo ने गुगल प्ले स्टोअरवर व्हॉट्सॲपचे हे आगामी वैशिष्ट्य स्पॉट केले आहे आणि आगामी अपडेट Android 2.25.1.10 साठी Beta मध्ये दिसले आहे. WebetaInfo ने या फीचरचा स्क्रीनशॉट देखील शेअर केला आहे. सध्या हे फीचर बीटा यूजर्ससाठी सादर करण्यात आले आहे. पण लवकरच कंपनी ते सर्व वापरकर्त्यांसाठी आणणार आहे.

व्हॉट्सॲपमध्ये हे नवीन अपडेट आल्यानंतर यूजर्स त्यांच्या सोयीनुसार चॅट्स आणि ग्रुप्समध्ये ॲनिमेशन मॅनेज करू शकतील. हे फीचर अशा यूजर्सना सुविधा देईल ज्यांना मॅसेज ॲनिमेट करायचा आहे.

या फीचरमध्ये वापरकर्त्यांना तीन वेगवेगळ्या प्रकारचे पर्याय मिळतील, ज्यामध्ये इमोजी, स्टिकर्स आणि GIF फाइल्स मॅनेज करण्याचे पर्याय असतील. याशिवाय व्हॉट्सॲपचे हे नवीनतम अपडेट नुकत्याच लाँच झालेल्या ॲनिमेटेड इमोजीलाही सपोर्ट करेल.

व्हॉट्सॲपने व्हिडिओ कॉलसाठी फेस्टिव बॅकग्राउंड आणि फिल्टर हे नवीन अपडेट अलीकडेच रोलआऊट केले आहेत, जे तुमचे कॉल आणखी आकर्षक आणि मजेदार बनवतील. हे नवीन बॅकग्राउंड आणि फिल्टर्स व्हिडिओ कॉलिंगचा अनुभव खास बनविण्यात मदत करतील.

व्हॉट्सॲपने ग्रुप कॉलमध्ये एक नवीन फीचर जोडले आहे, ज्याच्या अंतर्गत कॉल सुरू करताना वापरकर्ते विशिष्ट सदस्य निवडू शकतात. याचा अर्थ तुम्ही तुमच्या कॉलमध्ये फक्त तेच लोक समाविष्ट करू शकता ज्यांच्याशी तुम्हाला बोलायचे आहे.

व्हॉट्सॲपने एक नवीन फीचर सादर केले आहे, ज्याच्या अंतर्गत वापरकर्ते व्हिडिओ कॉल दरम्यान देखील उच्च-रिझोल्यूशन व्हिडिओंचा आनंद घेऊ शकतील. हे वैशिष्ट्य मोबाइल आणि डेस्कटॉप दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.

हेही वाचा :.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना जीवे मारण्याची धमकी, व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल, इन्स्टाग्राम लाईव्हवर शिवीगाळ

भर रस्त्यात माथेफिरू बॉयफ्रेंडचा गर्लफ्रेंडवर हल्ला; हत्येचा प्रयत्न! Video

पती आणि पत्नी दोघेही PM किसान योजनेचा लाभ घेऊ शकतात का?