अग्निवीरांसाठी सरकारी नोकऱ्यांमध्ये 10 टक्के आरक्षण आणि अतिरिक्त लाभांची घोषणा
मुंबई: भारतीय सैन्य (army) दलातील अग्निवीरांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारने नुकतीच एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे की सरकारी नोकऱ्यांमध्ये अग्निवीरांना 10 टक्के आरक्षण देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे सैन्य दलातील जवानांना त्यांच्या सेवेनंतरच्या करिअरमध्ये मोठा फायदा होणार आहे.
याशिवाय, हरियाणा सरकारने अग्निवीर सैनिकांसाठी आणखी काही विशेष लाभ जाहीर केले आहेत. हरियाणा सरकारने घोषणा केली आहे की अग्निवीर सैनिकांना सरकारी थेट भरतीमध्ये सूट मिळेल आणि त्यासोबतच त्यांना 5 लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज दिले जाईल.
काँग्रेसने अग्निवीराबाबत खोटा प्रचार केला असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. हरियाणा सरकारने जाहीर केले आहे की वाहतूक अपघात झाल्यास सरकार भरपाई देईल. तसेच, रस्ते अपघातात जखमी झालेल्या अग्निवीरांचा खर्चही सरकार करणार आहे.
अग्निवीरांना (army) औद्योगिक क्षेत्रात अधिक चांगल्या संधी मिळाव्यात यासाठी, सरकारने आणखी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. कोणत्याही औद्योगिक युनिटने अग्निवीरांना दरमहा ३० हजार रुपयांपेक्षा जास्त पगार दिल्यास, त्या औद्योगिक युनिटला वर्षाला ६० हजार रुपये अनुदान देण्यात येईल.
हेही वाचा :
४ राशींनी गुंतवणूक करणे टाळा! कर्जाचा डोंगर वाढेल
लाडकी बहीण योजनेसाठी तुफान प्रतिसाद: दीड हजारांच्या ओवाळणीसाठी 4 लाखांहून अधिक अर्ज
महापालिका शिक्षण खात्यात ३३० कोटींचा घोटाळा, काँग्रेसचा गंभीर आरोप, निविदा प्रक्रियेत हलगर्जीपणा