अभिनेता गोविंदाच्या आयुष्यात सुनिता सोडून अजून दोन बायका….

बॉलिवूड अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता आहुजा यांच्या (Bollywood)घटस्फोटाच्या चर्चा जोर धरत असताना, त्याच्या जुन्या मुलाखतीतील वक्तव्य पुन्हा चर्चेत आले आहे. या मुलाखतीत गोविंदाने दोन लग्नाच्या शक्यतेबाबत भाष्य केले होते. त्याने स्पष्टपणे म्हटले होते की, त्याच्या कुंडलीत दोन लग्नाचा योग आहे आणि भविष्यात त्याचे दुसरे लग्न होऊ शकते.

सुनीताने घटस्फोटाची नोटीस पाठवली? :
गोविंदा आणि ३० वर्षीय मराठी अभिनेत्रीच्या अफेअरच्या चर्चांदरम्यान, सुनीताने सहा महिन्यांपूर्वीच घटस्फोटाची नोटीस पाठवली होती, असे बोलले जात आहे. दोघेही गेल्या काही वर्षांपासून वेगळे राहत असल्याचेही समोर आले आहे. या चर्चांना अधिक बळ मिळत असताना, गोविंदाच्या जुन्या वक्तव्याने नवीन वाद निर्माण केला आहे. एका मुलाखतीत गोविंदाने सांगितले होते की, “सुनितासोबत माझे नाते फक्त एन्जॉय करण्यासाठी होते.(Bollywood) मात्र, त्याचवेळी माझे नीलमशी चांगले संबंध होते. मी तिला पाहताच प्रभावित झालो होतो.”

गोविंदाने नीलमबरोबर लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण नीलमने हा विषय टाळला. त्याचवेळी गोविंदाने सुनीतासोबत मंदिरात गुपचूप लग्न केले, मात्र नीलमला याची कल्पनाही नव्हती. जेव्हा सुनीताने नीलमबद्दल काही वक्तव्य केले, तेव्हा गोविंदाला राग आला आणि त्यांनी सुनीताशी नातं तोडण्याचा (Bollywood)निर्णय घेतला. मात्र, काही काळानंतर सुनीतानेच पुढाकार घेत पुन्हा नातं सांभाळण्याचा प्रयत्न केला.

“माझ्या कुंडलीत दोन लग्न, सुनीताने तयार राहावं” गोविंदा या मुलाखतीत गोविंदाने धक्कादायक वक्तव्य करत म्हटलं होतं की, “भविष्यात मी दुसऱ्या कोणत्यातरी मुलीमध्ये गुंतू शकतो आणि तिला लग्नासाठी विचारू शकतो. सुनीताने यासाठी तयार राहिलं पाहिजे. माझ्या कुंडलीत दोन लग्नाचा योग आहे.”गोविंदाच्या या वक्तव्यामुळे आता चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. त्याने यावेळीच दुसऱ्या लग्नाची हिंट दिली होती का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हेही वाचा :

कॅन्सरमुळे प्रसिद्ध गायकाचे निधन…

शरद पवारांचा शिलेदार अजितदादांच्या गाडीत, एकत्रित प्रवास अन् राजकीय वर्तुळात चर्चा

मुलाच्या बर्थ डे पार्टीतून गोविंदा गायब; यशवर्धनने आई आणि बहिणीसोबत कापला केक, VIDEO व्हायरल