दारुपार्टीत वाद; रागाच्या भरात व्यावसायिकाच्या मुलाला 5 स्टार हॉटेलच्या टेरेसवरून फेकलं : video

उत्तर प्रदेशामध्ये एका व्यावसायिकाने आपल्या मुलाच्या मित्राला 5 स्टार हॉटेलच्या(cocktail party drinks) टेरेसवरून फेकल्याची घटना घडली आहे. रविवारी पहाटे घडलेली ही थरारक घटना बरेली येथील हॉटेलमध्ये बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेचा सीसीटीव्हीही समोर आला आहे. यामध्ये एक व्यक्ती मारहाण करताना आणि नंतर एका मुलाला छतावरून खाली फेकताना दिसत आहे.

एका 5 स्टार हॉटेलमध्ये प्री-वेडिंग पार्टी सुरू होती. दारूच्या नशेत(cocktail party drinks) हा गोंधळ सुरू झाला. यामध्ये एका व्यावसायिक पिता-पुत्राने दुसऱ्या व्यावसायिकाच्या मुलाला मारहाण करून छतावरून खाली फेकल्याची घटना घडली आहे.

पीडित मुलाला गंभीर अवस्थेत वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आलं आहे. या संपूर्ण हाणामारीचा आणि मुलाला टेरेसवरून फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या प्रकरणी या पिता-पुत्रावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण इज्जतनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका पंचतारांकित हॉटेलशी संबंधित आहे.

राजेंद्र नगरचे रहिवासी संजय अग्रवाल यांनी सांगितलं की, त्यांचा मुलगा सार्थक अग्रवाल दोघेही औषधाचा व्यवसाय करतात. ते सुरक्षा मंचाचे वरिष्ठ उपाध्यक्षही आहेत. त्यांचा मुलगा सार्थक अग्रवाल आरोग्य क्षेत्रात रसायनाचा व्यवसाय करतो. सार्थक अग्रवाल त्याचा मित्र आणि जनकपुरीचा रहिवासी रिद्दीम अरोरा आणि इतर मित्रांसह हॉटेल रेडिसनमध्ये एका पार्टीला गेला होता. येथे प्री-वेडिंग पार्टी सुरू होती. यादरम्यान बाचाबाची झाली. शिवीगाळ केल्यानंतर रिद्दीम अरोरा याने वडील आणि कापड व्यावसायिक संजीव अरोरा यांना फोन करून तिथे बोलावले होते.

सार्थक अग्रवालने संजीव अरोराची माफी मागितली, पण तरीही प्रकरण शांत झालं नाही. सतीश अरोरा आणि त्यांचा मुलगा रिद्धिम (crime) यांनी सार्थक अग्रवाल याच्यावर प्राणघातक हल्ला केला. त्याला धक्काबुक्की करत हॉटेलच्या छताखाली फेकून दिल्याचा आरोप आहे. यामुळे तो गंभीर जखमी झाला आहे.

या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी इज्जतनगर पोलीस ठाणे गाठले. जखमी सार्थकला वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आलं आहे. त्याची प्रकृती गंभीर आहे. पोलीस निरीक्षक इज्जतनगर जयशंकर सिंह यांनी सांगितलं की, या प्रकरणी प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा :

राखी सावंत हिला होणार अटक? कोर्टात घेतली धाव, ते प्रकरण..

सर्वात मोठी बातमी ! मुंबईतील भाजपच्या कार्यालयाला भीषण आग; धुराचे प्रचंड लोट

गोरगरिबांचे हक्काचे घरकुल काँग्रेसच्या पुढार्‍यांनी वाटून खाल्ले; हिना गावित यांची काँग्रेसवर टीका