गोविंदाने मंदिरात जाऊन गुपचूप उरकलं लग्न

बॉलिवूड अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता आहुजा यांच्या (secretly)घटस्फोटाच्या चर्चा सध्या जोरात सुरू आहेत. मात्र, या पार्श्वभूमीवर त्याची एक जुनी मुलाखत पुन्हा चर्चेत आली आहे. या मुलाखतीत गोविंदाने नीलमबाबत आपल्या मनातील भावना स्पष्टपणे व्यक्त करताना सांगितले होते की, त्याने तिच्यावर खूप प्रेम केले. त्याचवेळी सुनीतासोबत असलेल्या त्याच्या नात्यात मोठा वाद निर्माण झाला होता.

नीलमवरचं प्रेम आणि सुनीतासोबत वाद का झाले?
गोविंदा आणि नीलम यांची ओळख त्यांच्या चित्रपटाच्या सेटवर झाली होती. पहिल्याच भेटीत तो तिला पाहून भारावून गेला होता. “मी नीलमला पाहताच तिच्यावर भाळलो होतो. तिच्यासोबत अधिक वेळ घालवण्याची इच्छा होती,” असे त्याने एका मुलाखतीत सांगितले होते.
त्या काळात सुनीतासोबतही त्याच्या भेटीगाठी सुरू होत्या. मात्र, नीलमशी लग्न करण्याची त्याची इच्छा होती. मात्र, नीलम हा विषय टाळत होती. दुसरीकडे, सुनीतासोबत त्याचं मंदिरात (secretly)गुपचूप लग्न झालं, पण ही गोष्ट नीलमला माहीत नव्हती. जेव्हा सुनीताने नीलमबद्दल काही वक्तव्य केलं, तेव्हा दोघांमध्ये मोठा वाद झाला आणि गोविंदाने तिला सोडण्याचा निर्णय घेतला. काही काळानंतर सुनीताने पुढाकार घेत नातं सावरण्याचा प्रयत्न केला.
“माझ्या कुंडलीत दोन लग्न, सुनीताने तयार राहावं” – गोविंदा
या चर्चेत भर टाकत गोविंदाच्या जुन्या मुलाखतीतील आणखी एक धक्कादायक वक्तव्य समोर आले आहे. तो म्हणाला होता, “भविष्यात मी दुसऱ्या कोणत्यातरी मुलीमध्ये गुंतू शकतो आणि (secretly)तिच्यासोबत लग्न करू शकतो. सुनीताने यासाठी तयार राहिलं पाहिजे. माझ्या कुंडलीत दोन लग्नाचा योग आहे.”या वक्तव्यावरून गोविंदाने कदाचित त्याच्या दुसऱ्या लग्नाची पूर्वसूचना दिली होती, असे बोलले जात आहे. त्यामुळे आता तो खरंच दुसऱ्या लग्नाचा विचार करतोय का, की ही फक्त चर्चाच ठरणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा :
30 वर्षांनी सोनाली आणि राज ठाकरे दिसले एकत्र
इचलकरंजी पत्नीचा मृत्यू, अन् पतीने घेतली कृष्णा नदीत पुलावरून उडी
तुमच्या मुलीला लग्नात चुकूनही ‘या’ भेटवस्तू देऊ नये, अन्यथा..