मारहाण व मराठी भाषेला हिणवणाऱ्या शुक्लाला अटक करा अन्यथा…; मनसे आक्रमक

कल्याणच्या योगीधाम परिसरात असलेल्या अजमेरा सोसायटीत अखिलेश शुक्ला नावाच्या एका सरकारी अधिकाऱ्याने अभिजित देशमुख नामक एका मराठी व्यक्तीला बेदम मारहाण केली(current political news). या हिंदी भाषिक अधिकाऱ्याने गुंड बोलवून मारहाण केली असल्याचा आरोप समोर येत आहे. या घटनेनंतर संताप व्यक्त केला जातोय. इतकंच नाही तर या हिंदी भाषिक अधिकाऱ्याने मराठी भाषेबद्दल देखील अपशब्द वापरले आहेत. यानंतर मनसे चांगलीच आक्रमक झाली आहे.

मनसेचे(current political news) कल्याण जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांनी अखिलेश शुक्ला यांना तातडीने अटक करण्याची मागणी केली आहे. 24 तासांत आरोपीला अटक केली नाही तर मनसे रस्त्यावर उतरणार. आम्ही रस्त्यावर उतरल्यावर काय होईल माहिती आहे. आम्ही शुक्लाला जिथे असेल तिथून आमच्या पद्धतीने उचलून पोलीस स्टेशनमध्ये जमा केल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराच मनसे नेते उल्हास भोईर यांनी दिला आहे.

मराठी माणसांना अर्वाच्य शिव्या देणाऱ्या आणि मारहाण करणाऱ्या शुक्ला नावाच्या माणसाविरोधात कायदेशीर कारवाई करा. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरेल, असा गंभीर इशारा मनसेने दिला आहे. मराठी माणसाला शिव्या देणाऱ्या शुक्लाला मनसे सरळ करेलच पण मराठी माणसाने देखील आता जागं व्हायला हवं, असंही उल्हास भोईर यांनी म्हटलं आहे.

मिळालेल्या माहीतीनुसार, सरकारी नोकरी करणारे अखिलेश शुक्ला आणि वर्षा कळवीकट्टे हे योगीधाम सोसायटीत शेजारी राहतात. अखिलेश यांच्या पत्नी गीता या घराबाहेर देवपूजा करुन धूप लावतात. मात्र, याचा धूर वर्षा कळवीकट्टे यांच्या घरात जाऊन त्यांच्या तीन वर्षांच्या बाळाला आणि वयोवृद्ध आईला त्रास होत होता. याबाबत वर्षा कळवीकट्टे यांनी अखिलेश यांच्या पत्नी गीता यांना सांगितले. मात्र गीता यांनी वाद घालण्यास सुरुवात केली.

त्यानंतर त्यांच्या बाजूला राहणारे अभिजित देशमुख आणि धीरज देशमुख यांनी मध्यस्थी करत हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, या दोघांनी मध्यस्थी केली याचा राग शुक्ला यांना आला आणि त्यांनी काही बाहेरच्या लोकांना बोलवून या दोघांना मारहाण केली.यात मराठी भाषिक अभिजित देशमुख गंभीर जखमी झाले आहेत.

यानंतर देशमुख यांनी पोलीस तक्रार केली आहे. देशमुख गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच, शुक्ला हे सरकारी नोकरीवर आहेत की नाही ते काय काम करतात त्याची चौकशी करण्यात येत आहे. या प्रकरणी आता राज्यभरातून संताप व्यक्त केला जातोय

हेही वाचा :

पाणी प्रदूषणामुळे मिरजेतील गणेश तलावात ६०० किलो मासे मृत

हेल्मेट सक्तीबाबत महिलेचे विचित्र विधान; ऐकून पोलीसही झाले हैराण

यंदा MPSC च्या वर्षभर परीक्षाच-परीक्षा; वेळापत्रकही जाहीर, सरकारी नोकरीचा प्रयत्न करणाऱ्यांना ‘अच्छे दिन’