निवडणूक होताच प्रवाशांना पहिला झटका, लालपरीचा प्रवास महागणार?
महाराष्ट्रात नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. (septic shock)राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार स्थापन झाले आहे. निवडणुकीपूर्वी अनेक दैनंदिन वस्तूच्या किमतीमध्ये दरवाढ दिसून आली. अजूनही खाद्य पदार्थांपासून इतर वापराच्या वस्तुमध्ये तेजी आहे. अशात सर्व सामान्य नागरिकांना आणखी एक झटका देणारी बातमी समोर आली आहे. आता लवकरच एसटी प्रवास देखील महागणार आहे. राज्यात नवे सरकार स्थापन झाल्यावर आता भाववाढीची टांगती तलवार नागरिकांच्या डोक्यावर येऊन पडली आहे. एसटी महामंडळाने तब्बल 14.95 टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव दिला आहे. यावर राज्य सरकार अंतिम निर्णय घेण्याची शक्यता आहे, अशी माहिती एसटी महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले यांनी दिली.
“लालपरी संपूर्ण राज्यभरात सेवा पोहचवते. पण महामंडळाकडे बसेस कमी आहेत. नवीन वर्षामध्ये तीन ते साडेतीन हजार नव्या बसेस आम्ही आणणार आहोत. यातील काही नवीन बसेस घेतोय तर काही भाडे तत्वावर घेतोय. अशोक लेलँडच्या 2200 बसेस आपण आणतोय. नव्या बस आणल्यावर जुन्या बसेस स्क्रॅप कराव्या लागतील. यामुळे अपघात कमी होतील”, असं भरत गोगावले म्हणाले.गेल्या 3 वर्षांपासून महामंडळाने(septic shock) भाडेवाढ केली नव्हती. त्यामुळे आता काही प्रमाणात भाडेवाढ केली जाईल. 14.95 टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव महामंडळाकडून ठेवण्यात आला आहे. त्यावर राज्य सरकार निर्णय घेईल, असंही पुढे भरत गोगावले म्हणाले.
सध्या महामंडळाला मोठा तोटा होत आहे. दररोज 15 कोटी रुपयांचे एसटी महामंडळाला नुकसान होत आहे. ही तूट भरून काढण्यासाठी महामंडळाने भाडेवाढीचा प्रस्ताव शासनाकडे सादर केलाय. इंधनाचे वाढते दर, कर्मचाऱ्यांची वेतन वाढ, टायर आणि सुट्ट्या भागांच्या दरामध्ये झालेली वाढ यामुळे महामंडळाने तिकिट दर व भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. आता याला देवेंद्र फडणवीस सरकार मान्यता देणार का?, ते (septic shock)पहावे लागेल.एसटी महामंडळाकडून भाडेवाढीचा प्रस्ताव शासनाकडे निवडणुकीपुर्वी सादर करण्यात आला होता. मात्र, शिंदे सरकारने या बाबत कोणताही निर्णय दिला नव्हता. आता निवडणुका होऊन नवे सरकार स्थापन झाले आहे. आता यावर काय निर्णय होणार, त्याकडे सर्वांचं लक्ष असेल.
हेही वाचा :
सोन्याच्या दरात आज पुन्हा झाली घट; काय आहेत 22,24,18 कॅरेटचे भाव, जाणून घ्या
राष्ट्राध्यक्षांच्या खुर्चीवर बसण्याआधीच डोनाल्ड ट्रम्प यांची भारताला धमकी
एकनाथ शिंदेंकडे गृहनिर्माण, अजित पवारांकडे अर्थ; देवेंद्र फडणवीसांकडे कोणतं खातं?