खेळाडूचा संताप आऊट होताच बॅटने हेल्मेट फेकून बाऊंड्रीपार पाहा VIDEO
वेस्टइंडीजला शेवटच्या षटकात षटकांराचा पाऊस पाडून विजय मिळवून(declared) देणारा कार्लोस ब्रेथवेट तुफान चर्चेत आहे. यावेळी षटकार मारल्यामुळे नव्हे, तर थेट हेल्मेट सीमारेषेपार पोहचवल्यामुळे त्याची चर्चा सुरु आहे.अंपायरने बाद घोषित केल्यानंतर त्याला इतका राग आला की, रागाच्या भरात त्याने बॅटने हेल्मेट सीमारेषेबाहेर पोहचवलं. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
कार्लोस ब्रेथवेट हा मोठे फटके खेळण्यासाठी ओळखला जातो. मात्र अंपायरने बाद घोषित केल्यानंतर त्याला राग अनावर झाला. त्याचा राग त्याने आपल्या हेल्मेटवर काढला. तर झाले असे की, स्ट्राईकर्स विरुद्ध जॅग्वार यांच्यात रोमांचक सामना पार पडला.या सामन्यातील ९ वे षटक टाकण्यासाठी जोश लिटील गोलंदाजीला आला. त्याने या षटकातील तिसरा चेंडू शॉर्ट टाकला. हा चेंडू कार्लोस ब्रेथवेटच्या खांद्याला जाऊन लागला. त्यावेळी यष्टीरक्षकाने सोपा झेल टिपला. झेल टिपताच त्याने अपील केली. अंपायरला वाटलं चेंडू ग्लोव्हजला लागला आहे. त्यामुळे त्यांनी बोट दाखवलं.
Remember the name.. Carlos Brathwaite.. pic.twitter.com/uTr7DNl0Bv
— Nibraz Ramzan (@nibraz88cricket) August 25, 2024
अंपायरने दिलेला हा निर्णय कार्लोस ब्रेथवेटला पटला नाही. मात्र (declared)त्याला मैदान सोडावं लागलं. बाद नसतानाही मैदान सोडण्याचा राग ब्रेथवेटला सहनच झाला नाही. दरम्यान बाद झाल्यानंतर मैदानाबाहेर जात असताना त्याने रागाच्या भरात हेल्मेट काढलं आणि बॅटने चेंडू टोलवतात, तसं हेल्मेट थेट सीमारेषेबाहेर टोलवलं.
राग असला तरीदेखील क्रिकेटच्या साहित्यांसोबत (declared)असं करणं हा क्रिकेटचा अपमान आहे. अशा प्रतिक्रिया नेटकरी देताना दिसून येत आहे. दरम्यान हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होऊ लागला आहे.कार्लोस ब्रेथवेट बाद झाल्याचा न्यूयॉर्क स्ट्राईकर्स संघाला फार काही फटका बसला नाही. कारण या सामन्यात न्यूयॉर्क स्ट्राईकर्स संघाने जॅग्वार संघावर ८ धावांनी विजय मिळवला आहे.
हेही वाचा :
शिवरायांच्या पुतळ्याच्या दुर्घटनेवर रितेश देशमुखची भावुक प्रतिक्रिया
कोकणातील दहीहंडीचा अनोखा थरार: ४० फूट खोल विहिरीत फोडण्याचा अनुभव, एकदा पाहाच Video
नववी ते बारावीच्या मार्क्सची एकत्रित गणना; बोर्डांच्या मूल्यमापनात समानता आणण्याचे नवीन प्रयत्न