आषाढी एकादशी: उपवासाच्या विविध पद्धती आणि खवय्यांसाठी खास रेसिपी – उपवासाची कचोरी!

आषाढी एकादशी 17 जुलै 2024 ला साजरी होणार आहे. आषाढी एकादशी हिंदू धर्मांमध्ये (religion)सर्वात पवित्र आणि महत्वाची मानली जाते. या दिवशी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले विठ्ठल भक्त विठूरायाच्या चरणी लीन होतात. या दिवशी विठुरायाची आणि भगवान विष्णूची पूजा केली जाते. उपवास केला जातो. उपवास करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. या दिवशी काहीजण फलाहार करतात, तर काहीजण फराळाचे पदार्थ खातात.

खरंतर उपवास म्हटंल की, शाबुदाणा वडा, उपवासाची मिसळ, बटाट्याचे चिवडा, शाबुदाण्याचा चिवडा, वेफर्स असे अनेक पदार्थ डोळ्यांसमोर येतात.

एकादशी… अन् दुप्पट खाशी, अशी म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. आणि ही प्रत्यक्षात प्रचलित आणण्याचे काण अनेक खवय्ये करत असतात. अनेकजण उपवास फक्त विविध पदार्थांची चव चाखण्यासाठी करताना दिसतात. या खवय्यासाठी मी खास रेसिपी घेऊन आली आहे ती म्हणजे उपवासाची कचोरी. घरी तुम्हीदेखील एकदा ट्राय कराच.

उपवासाची कचोरी रेसिपी

साहित्य:

  • १ कप शिंगाडा किंवा राजगिरा पीठ
  • २ मध्यम बटाटे (उकडून किसलेले)
  • १/२ कप किसलेला नारळ
  • २-३ हिरव्या मिरच्या (बारीक चिरलेल्या)
  • १ चमचा जिरे
  • १ चमचा साखर
  • १/२ चमचा लिंबाचा रस
  • मीठ चवीनुसार
  • तळण्यासाठी तेल

पद्धत:

  1. एका मोठ्या बाऊलमध्ये शिंगाडा किंवा राजगिरा पीठ, उकडलेले बटाटे, किसलेला नारळ, हिरव्या मिरच्या, जिरे, साखर, लिंबाचा रस आणि मीठ एकत्र करा.
  2. या मिश्रणाला थोडे थोडे पाणी घालून घट्ट कणिक मळा.
  3. या कणकेचे छोटे-छोटे गोळे करा आणि त्यांना चपटा करून कचोरीच्या आकारात बनवा.
  4. कढईत तेल गरम करा आणि कचोरी तळून घ्या.
  5. कचोरी गोल्डन ब्राउन रंगाच्या होईपर्यंत तळा.
  6. तळलेल्या कचोरी कागदी टॉवेलवर काढा जेणेकरून अतिरिक्त तेल शोषले जाईल.

गरमागरम उपवासाच्या कचोरी तयार आहेत! ह्या कचोरी तुम्ही दही किंवा नारळाच्या चटणी सोबत सर्व्ह करू शकता.

हेही वाचा :

आयटी फ्रेशर्ससाठी आनंदाची बातमी टीसीएस करणार तब्बल चाळीस हजार कर्मचाऱ्यांची भरती

महापालिका शिक्षण खात्यात ३३० कोटींचा घोटाळा, काँग्रेसचा गंभीर आरोप, निविदा प्रक्रियेत हलगर्जीपणा

अजित दादांना महायुतीतून बाहेर पडण्याची प्रकाश आंबेडकरांची मोठी ऑफर;