मेष :

या सप्ताहात हिंदू नववर्षांची सुरुवात होत आहे. हा पाडवा सुखासमाधानाचा व आनंदाचा जाईल. दिनांक ७, ८ हे दोन दिवस मात्र कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेऊ नका. चांगल्या कामासाठी वेळ गेला तरी चालेल. (astrology reading)मात्र घाई करून कोणतेच काम करू नका. स्वत:च्या कामाची जबाबदारी इतरांवर टाकू नका. अमावास्या तुमच्या व्ययस्थानातून होत आहे. या दिवशी शांत राहून प्रत्येक गोष्ट करा. बाकी दिवसांचा कालावधी चांगला असेल. व्यावसायिकदृष्टय़ा आतापर्यंत ठरवून ठेवलेले समीकरण जुळून येत नव्हते. सध्या हे समीकरण जुळून येणारे आहे. नवीन व्यवसायाची सुरुवात होईल. नोकरदार वर्गाला कामाचा ताण कमी होईल. खर्च जपून करा. कौटुंबिक जबाबदारी पार पाडाल. वैवाहिक सौख्य लाभेल. प्रकृतीत सुधारणा होईल.

शुभ दिनांक : ९, १०

वृषभ

हिंदू नववर्षांची सुरुवात नव्या संकल्पनांना आवाहन देऊन कराल, असे म्हणायला हरकत नाही. हा दिवस व्यस्त असेल तितका आनंदी असेल. मात्र या दिवशी संयम ठेवा. दिनांक ९, १० हे दोन दिवस म्हणजे तारेवरची कसरत असणार आहे. या दिवसांत नियोजनाला महत्त्व द्या. त्यामुळे कामात अडथळा येणार नाही. अमावास्या लाभस्थानातून होत आहे. नक्कीच लाभ होणार आहे. बाकी दिवसही चांगले असतील. या चांगल्या दिवसांत गोष्टी जमेच्या ठरतील. व्यवसायात भरभराट होईल. नोकरदार वर्गाला जादा कामाची जबाबदारी मिळेल. आर्थिक बाबतीत बचत करणे योग्य राहील. मुलांच्या आवडीनिवडीकडे लक्ष द्याल. मैत्रीचे नाते दृढ होईल. कुटुंब आनंदी असेल. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. धर्मिक गोष्टींची आवड राहील.

प्रकृतीची काळजी घ्या.

शुभ दिनांक : ११, १२

मिथुन :

लाभस्थानातून होणारी गुढीपाडव्याची सुरुवात लाभदायक ठरेल. हा पाडवा तुमच्यासाठी(astrology reading) शुभकारक ठरेल. दिनांक ११ व १२ हे संपूर्ण दोन दिवस व १३ तारखेला दुपापर्यंत असा हा अडीच दिवसांचा कालावधी चढउतारांचा राहील. या दिवशी जे काही करायचे आहे ते खूप विचारपूर्वक करावे लागेल. कारण या कालावधीत फसवणूक होऊ शकते. ही फसवणूक होऊ नये असे वाटत असेल तर मोह आवरा. या दिवसांत महत्त्वाचे काम पुढे ढकला. या दिवसांत एखादी गोष्ट मनाला नाही पटली तर ती सोडून द्या. त्यावर फारसा विचार करत बसू नका. अमावास्या व बाकी दिवस चांगले असतील. व्यवसायातून मिळणारे उत्पन्न चांगले असेल. नोकरदार वर्गाचे कामकाज सुरळीत चालू राहील. आर्थिकदृष्टय़ा आवक पाहून जावक ठरवा. घरगुती वातावरण चांगले राहील. आरोग्याची काळजी घ्या.

शुभ दिनांक : ९, १०

कर्क :

नवीन वर्षांची सुरुवात नवे स्वप्न पूर्ण करणारी आहे. हा पाडवा शुभदायी जाईल. १३ तारखेला दुपारनंतरचा अर्धा दिवस फक्त शुभ नाही. अमावास्या भाग्यस्थानातून होत आहे. बाकी दिवसात चंद्र ग्रहाचे भ्रमण भाग्यस्थानातून लाभस्थानाकडे होत आहे. असे भ्रमण म्हणजे दुधात साखर. सध्या कामकाजाची घडी सुरळीत (astrology reading)चालणार आहे. कोणत्याही कामाला अडथळा येणार नाही. कामातील गती वाढेल. हक्काचे यश मिळेल. अनेक मार्गातून आलेले प्रस्ताव व्यवसायासाठी फायद्याचे ठरतील. नोकरदार वर्गाच्या कामकाजात होणारे बदल हे चांगले असतील. आर्थिक विवंचना दूर होईल. राजकीय क्षेत्रात जोमाने काम कराल. जिवलग मित्र-मैत्रिणींची भेट होईल. नातेवाईकांशी संपर्क साधा. धार्मिक कार्यात सहभाग राहील. आरोग्य उत्तम राहील.

शुभ दिनांक : ७, १२

सिंह :

नवीन हिंदू वर्ष सुख-समृद्धीचे आणि भरभराटीचे जाणारे आहे. हा दिवस तुमच्यासाठी आनंददायक असेल. मनासारखी खरेदी कराल. दिनांक ७, ८ हे दोन दिवस मात्र जपून पाऊल टाकावे लागेल. कारण या दोन दिवसांत समोरून येणारा प्रस्ताव हा फारसा चांगला असेल असे नाही. कोणी काय बदल करावा याचा विचार करत बसण्यापेक्षा स्वत:त बदल करून पुढे जा. त्यामुळे त्रास होणार नाही. स्वत:च्या कामाव्यतिरिक्त इतर गोष्टीत लक्ष घालू नका. अमावास्या दिवस शांततेत पार पाडा. बाकी दिवसांचा कालावधी अतिशय उत्तम असेल. या चांगल्या कालावधीत शुभ गोष्टींचा शुभारंभ होईल. व्यवसायातील परिस्थिती चांगली असेल. नोकरदार वर्गाचा कामातील अंदाज खरा ठरेल. आर्थिकदृष्टय़ा आवक वाढेल. राजकीय क्षेत्रातील नियोजन परिपूर्ण यशस्वी होईल. नातेवाईकांकडून सुवार्ता कळेल. प्रकृती ठणठणीत राहील.

शुभ दिनांक : ९, १०

कन्या :

चैत्र गुढीपाडवा ही नवीन वर्षांची सुरुवात आहे. या दिवशी मनामध्ये कोणतीही अढी न ठेवता आनंद साजरा करा. दिनांक ९, १० हे दोन दिवस बेताचे असतील. तेव्हा नकळत आपल्याकडून स्पष्ट बोलल्यामुळे इतरांचे मन दुखावले जाऊ शकते. त्यामुळे बोलताना संयम ठेवा. विनोदाने का होईना कोणाला काही बोलायला जाऊ नका. तुम्हाला न पटणाऱ्या गोष्टींवर प्रतिक्रिया देऊ नका. त्यामुळे त्रास होणार नाही. बाकी दिवसांचा कालावधी चांगला असेल. व्यवसायातून अपेक्षेपेक्षा जास्त प्रमाणात उत्पन्न मिळेल. नोकरदार वर्गाने काम करताना ज्येष्ठांचा आदर करा. आर्थिक बाबतीत व्यवहार करताना काळजी घ्या. राजकीय क्षेत्रातील घडामोडींचा आढावा घेताना शब्द जपून वापरा. भावंडांशी संवाद साधाल. आहाराचे पथ्यपाणी सांभाळा.

शुभ दिनांक : ११, १२

तूळ :

गुढीपाडवा हा सण अगदी उत्साहाने साजरा कराल. हा दिवस चांगला जाईल. अमावास्या प्रहरात वादविवाद टाळा. षष्ठस्थानातून अष्टमस्थानाकडे चंद्राचे भ्रमण होत आहे असे भ्रमण असते अशावेळी जपून पाऊल टाकावे लागते हे लक्षात ठेवा. ज्या गोष्टीशी आपला काहीही संबंध नाही अशा गोष्टी समोर येऊ शकतात. कारण नसताना वादाचे प्रसंग निर्माण होऊ शकतात. तेव्हा शांतपणाने परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न करा. तडजोड स्वीकारा. त्यामुळे त्रास होणार नाही. ही परिस्थिती कायमस्वरूपी नाही तात्पुरत्या क्षणाची आहे. व्यवसायात नवीन उलाढाल वाढवू नका. नोकरदार वर्गाने कामात व्यस्त राहिलेले चांगले. खर्च जपून करा. राजकीय क्षेत्रात रोखठोक भूमिका टाळा. कुटुंबात गैरसमज होणार नाही, त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करा. प्रकृतीची काळजी घ्या.

शुभ दिनांक : ९ , १०

वृश्चिक :

हिंदू नववर्षांची सुरुवात करताना दिवस आनंदी कसा जाईल या दृष्टीने प्रयत्न करा. चढउतार असला तरी तो समजून घ्या. शुभ ग्रहांची साथ सध्या कमी आहे. असे म्हणायला हरकत नाही. प्रत्येक गोष्टीत तुमचेच खरे करत बसू नका. सध्या आपली बाजू ऐकून घेण्यासारखी परिस्थिती नाही. तेव्हा आपणच आपल्या मनाचा मोठेपणा दाखवून एक पाऊल पुढे जा. वादग्रस्त विषय टाळा. त्यामुळे त्रास होणार नाही. अमावास्या कालावधीत खरेदी करू नका. भागीदारी व्यवसायातील करार सध्या न केलेले चांगले. नोकरदार वर्गाने कामाचे वेळापत्रक आधी तयार करा. आर्थिकदृष्टय़ा व्यवहार करताना भावनिक गोष्टी टाळा. समाजमाध्यमांचा वापर न केलेला चांगला. कुटुंबाशी एकनिष्ठ राहा. आध्यात्मिक गोष्टीत गुंतून राहा.  प्रकृती स्वास्थ्य जपा.

शुभ दिनांक : ११, १२

धनू

नवीन वर्षांची सुरुवात सर्वासोबत अगदी उत्साहाने साजरी कराल. मनासारखी खरेदी कराल. दिवस आनंदीमय असेल. दिनांक ११,१२ हे संपूर्ण दोन दिवस व १३ तारखेला दुपापर्यंत असा हा अडीच दिवसांचा कालावधी मात्र सावधानतेने पुढे ढकलावा लागेल. म्हणजेच हे दिवस चांगले जावे असे तुम्हाला वाटत असतील तर तुम्ही शांत राहणे गरजेचे आहे. राईचा पर्वत करून काहीही साध्य होणार नाही हे लक्षात ठेवा. वातावरण कसेही असो तुमची भूमिका ठाम राहील. हे मात्र खरे आहे. बाकी दिवस चांगले असतील .व्यावसायिक दृष्टय़ा गुंतवणूक करताना विचार करा. नोकरदार वर्गाला कामात पूर्णपणे लक्ष केंद्रित करावे लागेल. खर्चाची बाजू सांभाळा. मित्रांसोबत मनमोकळेपणाने संवाद कराल. मुलांची आवडनिवड पूर्ण कराल. वैवाहिक सौख्य लाभेल. आरोग्याची काळजी घ्या.

शुभ दिनांक : ९ , १०

मकर :

गुढीपाडव्याचे औचित्य साधून तुम्ही तुमची हौस पूर्ण कराल. हा सण आनंदाने साजरा करताना जुन्या गोष्टींच्या मुळाशी जाऊ नका. १३ तारखेचा दुपारनंतरचा दिवस सोडला तर बाकी दिवस अतिशय उत्तम जातील. चांगल्या दिवसांमध्ये बरेच काही चांगले होते याचा अनुभव तर तुम्ही घेतला असेलच. पण त्यासाठी प्रयत्नही वाढवावा लागतो हेही तुम्हाला माहिती असेल. तेव्हा प्रयत्नांना कुठे कमी पडू नका. व्यवसायात अग्रेसर राहाल. मागील पोकळी भरून काढाल. नोकरदार वर्गाला चांगले काम केल्याबद्दल वरिष्ठांकडून कौतुकाची थाप मिळेल. आर्थिक नियोजन मार्गी लागेल. संततीचे लाड पुरवाल. घरगुती वातावरण चांगले राहील. धार्मिक कार्यासाठी खर्च कराल. मानसिक समाधान लाभेल. आरोग्य उत्तम राहील.

शुभ दिनांक : ११ , १२

कुंभ :

गुढीपाडवा या सणाचे औचित्य साधून सर्वासोबत उत्साहाने हा दिवस साजरा कराल. अमावास्या धनस्थानातून होत आहे. सप्ताहात सर्व दिवस चांगले असतील. प्रत्येक वेळी संघर्ष करूनच काम पूर्ण होते. सध्या मात्र हा संघर्ष करावा लागणार नाही. अनेक दिवस खोळंबलेली कामे होत राहतील. आपले काम दुसऱ्यांनी करावे याची अपेक्षा राहणार नाही. वेळेआधी गोष्टी पुर्ण होतील. त्यामुळे काम करताना उत्साह वाढेल. आगामी काळासाठी व्यवसायाचे जे नियोजन करणार आहात ते नियोजन यशस्वी होईल. नोकरदार वर्गाचे कामकाज पुर्ण होईल. आर्थिक बाबतीत समाधानाची बाब असेल. राजकीय क्षेत्रात महत्त्वाच्या गोष्टीवर चर्चा होईल. कुटुंबाची आवड निवड जपाल.धार्मिक कार्यात सहभाग राहील.मानसिक स्थैर्य लाभेल.  आरोग्य ठणठणीत राहील.

शुभ दिनांक : १२ , १३

मीन :

नव वर्षांची सुरुवात गोड असेल. यादिवशी कुटुंबासोबतचा बेत अगदी मौजमजेचा असेल. खरेदी कराल. अमावास्या तुमच्या राशीतूनच होत आहे. या आठवडय़ातील सर्व दिवस अनुकूल असतील. चांगल्या गोष्टींसाठी आता वेळ  लागणार नाही. आजवर जे स्वप्न पाहत होता ते प्रत्यक्षात पुर्ण होताना दिसणार आहे. विकास घडेल. नवीन व्यवसायाची सुरुवात होईल. नोकरदार वर्गाला नवीन कामाचा प्रस्ताव येईल. आर्थिक दृष्टय़ा प्रगती होईल. थोरामोठय़ांचे सहकार्य मिळेल. समाजमाध्यमाद्वारे होणारी प्रसिद्धी दिलासा देणारी असेल. नातेवाईकांच्या कार्यक्रमानिमित्त भेटीगाठी होतील.   जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. आनंदी वातावरण राहील. शेजाऱ्यांना मदत कराल. जोडीदाराची साथ राहील. मानसिक समाधान लाभेल. प्रकृती साथ देईल.

 शुभ दिनांक : ९१०

हेही वाचा :

संजू सॅमसनच्या नेतृत्वात राजस्थान सलग पाचव्या विजयासाठी सज्ज

अजितदादा म्हणाले तोंड उघडायला लावू नका

रानडुकराच्या हल्ल्यात युवक गंभीर जखमी