‘नेनौ में सपना, सपनों में सजना’ गाण्यावर काकूंनी धरला जबरदस्त ठेका; Video Viral

सोशल मीडियावर(social media) कधी काय पाहायला मिळेल याचा नेम नाही. रोज काहीतरी नवीन ट्रेंड्स सुरू होतात. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र व्हिडीओ आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळतात. सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी लोक दिवसाच्या प्रत्येक क्षणाला रील्स तयार करत आहेत. अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच काही ना काही रिल्स बनवत असतात. अलीकडच्या काळात सोशल मीडिया हे कला दाखवण्याचे उत्तम माध्यमबनले आहे.

सध्या एक भन्नाट असा व्हिडिओ सोशल मीडियावर(social media) व्हायरल होत आहे. एका महिलेने बॉलीवूड गाण्यावर भन्नाट डान्स केला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून नेटकऱ्यांच्या पसंतीस पडत आहे. ही महिला नेनौ में सपना, सपनों में सजना गाण्यावर मनसोक्त थिरकताना दिसत आहे. अनेकांनी व्हिडिओ पाहून आयुष्य असे आनंदात जगता आले पाहिजे असे म्हटले आहे. अनेकांनी काकुंचे कौतुकही केले आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका मैदानावर कोणतातरी कार्यक्रम सुरु असून या ठिकाणी काही महिला जमलेल्या आहेत. अजय देवगणआणि तमन्ना भाटियाचा चित्रपट हिम्मतवालामधील ‘नैनो में सपना’ गाणे सुरु आहे. हे गाणे सुरु होताच अनेक महिला आणि चिमुकल्यामुली डान्स(social media) करायला लागतात. याच वेळी एक महिला अनेकांचे लक्ष वेधून घेते. त्या गाण्यावर अगदी मनसोक्त थिरकायला लागतात. त्यांचे हावभाव, डान्स स्टेप्स, उत्साह ही अगदी भन्नाट आहेत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला देखील नक्की आवडेल.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म @mume_le_laddu_ या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारोहून अधिक लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहे. अनेकांनी व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया देत काकूंचे कौतुक केले आहे.

एका युजरने म्हटले आहे की, काकू, अगदी मस्तच तर दुसऱ्या एकाने असं मनसोक्त जगता आलं पाहिजे असे म्हटले आहे. काकू डान्स करत असताना तेथे उपस्थित अनेकांनी त्यांना प्रोत्सहन देण्यासाठी कडकडून टाळ्या वाजवल्या आहेत. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमामकूळ घालत आहे.

हेही वाचा :

अर्थसंकल्पात सर्वसामान्य लोकांना मोठा दिलासा

मेडिकल कॉलेजमध्ये 75 हजार जागा वाढवणार; अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा

गंभीर आजाराची 36 औषधे ड्युटी फ्री, सरकारची सर्वात मोठी घोषणा