बच्चू कड़ू महाविकास आघाडीत जाणार; शरद पवारांच्या भेटीमागचे कारण काय?
पुणे : प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आमदार बच्चू कडू गेल्या काही(politics) दिवसांपासून नाराजी असल्याच्या चर्चा आहेत. शुक्रवारी (ऑगस्ट) तर त्यांनी आक्रोश मोर्चा’ च्या माध्यमातून राज्यातील शेतकरी, दिव्यांग, प्रकल्पग्रस्त, कामगारांच्या विविध मागण्या निवेदनाद्वारे सरकारपुढे मांडल्या. ५ सप्टेंबर पर्यंत मागण्या मान्य न झाल्यास महायुतीतून बाहेर पडण्याचाही इशारा दिला. त्यानंतर आज ते पुण्यातील मोदी बागेत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेणार असल्याची बातमी समोर आल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत.
यासंदर्भात माध्यमांनी बच्चू कडू यांच्याशी (politics)संवाद साधला असता बच्चू कडू म्हणाले, ही भेट आगोदरच ठरली होती. कालचा मोर्चाबाबत सरकारशी चर्चा केली. तशीच शऱद पवार यांच्याशीही चर्चा करायची आहे. राज्यातील शेतकरी आणि दिव्यांगांचे, शेतमजूरांचे जे प्रश्न आहेत त्याबाबत त्यांच्याशी चर्चा करायाची आहे.
आजच्या भेटीत जर शरद पवार यांनी महाविकास आघाडीत येण्याची ऑफर दिली तर तुम्ही जाणार का, असा सवाल विचारलाअसता बच्चू कडू म्हणाले, कालच्या मागण्यांबात मुख्यमंत्र्यांनी वेळ मागितला आहे. राज्य सरकारला 1 सप्टेंबर पर्यंत सरकारला वेळ दिला आहे. 1 सप्टेंबर पर्यंत आम्ही इतर पक्षांशीही चर्चा करणार आहोत. मविआ सोबत जाण्याचा अद्याप निर्णय नाही.1 सप्टेंबर पर्यंत काहीच नाही. त्यानंतर विचार करू, शेतकरी, शेतमजूर आणि दिव्यांगांसाठी मुद्द्यांसाठी काहीही करू. असे सूचक विधानही त्यांनी यावेळी केले
तसेच, माझी नाराजी महत्त्वाची नाही शेतकऱ्यांचे, दिव्यांगाचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. त्यांच्यासाठी आम्ही लढत आहोत. मला कोणीही कंटाळले नाही. हा राज्याचा शेतकरी, शेतमजूर आणि दिव्यांगांसाठी शरद पवाारंकडे जात असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
हेही वाचा:
समृद्धी महामार्गावरील ८ किमीचा बोगदा: देशातील सर्वाधिक रुंदीचा बोगदा
ब्राझीलमध्ये ६२ प्रवाशांना घेऊन जाणारे विमान कोसळले, विमान जळून खाक
फडणवीसांचे आश्वासन: मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत आरक्षण देण्याची ग्वाही