टक्कल नवरीचा धाडसी लूक विग न घालता मिळवले 4 कोटी व्ह्यूज VIDEO VIRAL

लग्न हा प्रत्येक तरुण-तरुणीच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण असतो. त्यामुळे या दिवशी (moment)आपण सर्वात सुंदर दिसावे असे प्रत्येकाला वाटते. लग्नामध्ये ड्रेस, मेकअप किंवा हेअरस्टाईल सर्वकाही नववधूला परफेक्ट हवे असते. सुंदर दिसणे, चांगले कपडे परिधान करणे आणि लग्नात फॅन्सी हेअरस्टाईल करणे म्हणजे सुंदरता अशी व्याख्या वर्षानुवर्षांपासून समाजात रुजलेली आहे. यामुळे, सावळा रंग, चष्मा, अकाली पांढरे झालेले केस, एखाद्या अपघाताची खूण, व्यंग आदी लपवण्यासाठीच सर्व प्रयत्न केले जातात. पण स्वतःला जसे आहोत तसे स्वीकारणारे लोक कमीच असतात. अशाच एका धाडसी वधू-वरांची ही गोष्ट!

या धाडसी तरुणीने स्वतःच्या मनातला संघर्ष संपवून टाकल्यामुळे लोकांना आपोआपच तिला ‘वाहवा’ म्हणणे भाग पडले आहे. अमेरिकेत राहणारी कंटेंट क्रिएटर नीहर सचदेवा हिने तिच्या लग्नाचा व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून अनेक तरुण-तरुणींना सकारात्मक दृष्टीकोन आणि प्रेरणा मिळत आहे. अलोपेसियाचे निदान झालेल्या नीहरच्या या निर्णयाचे नेटकऱ्यांनी (moment)कौतुक केले आहे.अलोपेसियाचे निदान झालेल्या नवरीने उचलले धाडसी पाऊल


अलोपेसिया ही एक वैद्यकीय स्थिती आहे ज्यामुळे केस गळतात आणि अनेकदा टाळूवर टक्कल पडते. जेव्हा रोगप्रतिकारक शक्ती चुकून केसांच्या मुळांवर हल्ला करते, तेव्हा केस गळू लागतात. तेव्हा ही स्थिती उद्भवते.
व्हायरल व्हिडीओमध्ये पाहू शकता की, नीहरने सुंदर लाल लेहेंगा आणि स्टेटमेंट ज्वेलरी परिधान केली आहे. तिच्या डोक्यावर कोणताही केसांचा वीग लावलेला दिसत नाही. उलट, टक्कल केलेले असूनही ती अत्यंत आत्मविश्वासाने एकेक पाऊल टाकताना दिसत आहे. तिचा भावी पती अरुण व्ही. गणपतीयाच्याकडे ती चालत जाताना दिसते.

तो तिच्याकडे अत्यंत प्रेमाने पाहत आहे. ते एकमेकांना घट्ट मिठी मारताना दिसत आहेत. हा हृदयस्पर्शी क्षण पाहून पाहणाऱ्यांच्या डोळ्यांत पाणी येणे सहाजिक आहे. आता पर्यंत या व्हिडिओला ४ कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
नी पौबरोबर केलेल्या पॉडकास्टमध्ये बोलताना नीहरने तिचा प्रवास सांगितला. तिच्या आजाराचा तिच्या बालपणावर कसा परिणाम झाला याबद्दलही सांगितले. ती म्हणाली की, (moment)“कधीकधी, माझ्या डोक्यावर केस असायचे. पण नंतर माझ्या एका भुवयीवरील केस गळून पडू लागले. खूप दिवस माझे सर्व केस होते.

पण माझ्याकडे भुवया नव्हत्या आणि तेव्हा मी कदाचित 5 ते 7 वयोगटात होते. मी नेहमीच शैक्षणिक क्षेत्रात चांगली होते आणि मला वाटते की,”जेव्हा मी विग घालायला सुरुवात केली तेव्हा माझे गुण कमी झाले. कारण, आता मी वर्गात लक्ष देत नव्हते. मी ‘माझ्या केसांचा मागचा भाग ठीक आहे का?’ किंवा ‘मला माझा विग कुठल्या बाजूने खाली खेचण्याची गरज आहे का?’ यावर लक्ष देत होते. विग घालणे हा माझ्यासाठी चांगला पर्याय ठरला नाही. मी कोणताही वैद्यकीय उपचार घेऊ शकत नाही आणि म्हणून मी माझे केस पूर्ण काढण्याचा निर्णय घेतला आणि हा कदाचित माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम निर्णय होता,” नीहर म्हणाली

हेही वाचा :

भन्नाट ऑफर! HP चा लॅपटॉप मिळतोय फक्त 10 हजारात, खरेदीची सुवर्ण संधी

महाराष्ट्र हादरलं! आई-वडिलांनीच मुलीला साखळदंडात डांबून ठेवलं, समाजात खळबळ

ऐश्वर्या राय बच्चनची लेक आराध्याची दिल्ली उच्च न्यायालयात धाव