बँकांना सलग तीन दिवस सुट्टी, होळी असूनही ‘या’ राज्यांमध्ये बँका सुरुच राहणार

नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेनं(banks) देशभरातील सार्वजनिक आणि खासगी बँकां कोणत्या दिवशी बंद राहणार यासंदर्भातील यादी जाहीर केलेली आहे. सुट्ट्यांच्या यादीनुसार 13 ते 16 मार्च दरम्यान सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील बँका बंद राहणार आहेत.

14 मार्च म्हणजेच आजच देशातील विविध राज्यांमधील बँका(banks) बंद राहणार आहेत. त्रिपुरा, कर्नाटक, ओडिशा, तामिळनाडू, मणिपूर, केरळ आणि नागालँड या राज्यामधील बँका सुरु राहणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या 2025 च्या सुट्ट्यांच्या कॅलेंडरनुसार बँका सलग तीन दिवस बंद राहणार आहेत.
चार दिवस बँका बंद राहणार
14 मार्चला बँका होळीच्या निमित्तानं बंद राहणार आहेत. त्रिपुरा, कर्नाटक, ओडिशा, तामिळनाडू, मणिपूर, केरळ नागालँडमध्ये सुरु राहणार आहेत. अहमदाबाद, एजॉल, बेलापूर, भोपाळ, चंदीगड, डेहराडून, गंगटोक, गुवाहाटी, हैदराबाद, इटानगर, जयपूर, जम्मू, कानपूर, कोलकाता, लखनौ, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, पणजी, पाटणा, रायपूर, रांची, शिलाँग, शिमला, श्रीनगर मध्ये बँका बंद राहणार आहेत.
15 मार्चला बँका अगरताळा, भुवनेश्वर, इम्फाल आणि पाटणा येथे बंद राहणार आहेत.
16 मार्चला सर्व राज्यात रविवार असल्यानं बँका बंद राहणार आहेत.
बँकांच्या मार्च महिन्यातील सुट्ट्या
22 मार्च : चौथा शनिवार
23 मार्च : रविवार , साप्ताहिक सुट्टी
27 मार्च : जम्मू आणि श्रीनगरमध्ये बँका बंद राहणार
28 मार्च : जम्मू -काश्मीरमध्ये बँका बंद राहणार
30 मार्च : रविवार, साप्ताहिक सुट्टी
31 मार्च : हिमाल प्रदेश, मिझोरममध्ये बँका बंद राहतील.
शेअर बाजार बंद
होळी निमित्त विविध राज्यातील बँका बंद आहेत. त्या प्रमाणं भारतीय शेअर बाजार देखील बंद राहणार आहे. शेअर बाजार आता पुढच्या तीन दिवस बंद राहणार आहे. आता भारतीय शेअर बाजार थेट सोमवारी सुरु होईल. याशिवाय काही बँका देखील थेट सोमवारी सुरु होतील.
हेही वाचा :
दहावी आणि बारावी परीक्षांच्या निकालाची तारीख ठरली?
उन्हाळ्यात काकडीचा रायता खाताय? तर ‘ही’ बातमी वाचाच
कडाक्याच्या ऊन्हात एसी बंद पडला दुरूस्तीसाठी जाताच हातात आली सापांची पिल्ले video viral