बीसीसीआय यापुढे उचलणार नाही भारतीय खेळाडूंचा ‘भार’

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने गुरुवारी राष्ट्रीय संघासाठी नवीन 10 नियम जारी केले आहेत. न्यूझीलंडविरुद्धच्या मायदेशातील कसोटी मालिकेत क्लीन स्वीप आणि त्यानंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर बॉर्डर-गावस्कर करंडक स्पर्धेतील दारुण पराभवानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अतिशय कडक झाल्याचे दिसत आहे. या पराभवांना गांभीर्याने घेत भारतीय बोर्डाने खेळाडूंसाठी(Indian players) कडक नियम केले आहेत.

तसेच, बीसीसीआयने स्पष्ट केले आहे की जर कोणी खेळाडू(Indian players) किंवा कर्मचारी हे नियम पाळले नाहीत तर त्याला कठोर शिक्षा होईल. या धोरणाचे पालन न करणाऱ्या खेळाडूंना दंड आकारला जाईल, ज्यामध्ये त्यांचे रिटेनर फी केंद्रीय करारातून वजा करणे आणि आयपीएलमध्ये भाग घेण्यास बंदी घालणे समाविष्ट असू शकते. यातली एक महत्त्वपूर्ण नियम म्हणजे बॅगेजची पॉलिसी.

बोर्डाने बनवलेल्या नवीन बॅगेजची पॉलिसीनुसार, बोर्डाने बनवलेल्या नियमांनुसार एखाद्या खेळाडूने सामान नेले तर त्याला त्यासाठी कोणताही खर्च द्यावा लागणार नाही, परंतु तसे न झाल्यास खेळाडूंना हे पैसे द्यावे लागतील. आता प्रवासादरम्यान कोणताही खेळाडू आपल्यासोबत जास्त सामान घेऊन जाऊ शकणार नाही. जर सामानाचे वजन जास्त असेल, तर त्यासाठी खेळाडूंना स्वतः पैसे द्यावे लागतील. बीसीसीआयने वजन आणि सामानासाठी स्वतंत्र मार्गदर्शक तत्त्वेही जारी केली आहेत.

मोठे परदेशी दौरे (30 दिवसांपेक्षा जास्त):

  • खेळाडू – 5 पिशव्या (3 सूटकेस + 2 किट बॅग) किंवा 150 किलो कमाल एकूण वजन.
  • सपोर्ट स्टाफ- 2 पिशव्या (2 मोठ्या + 1 लहान सुटकेस) किंवा 80 किलो कमाल एकूण वजन.

छोटे परदेशी दौरे (30 दिवसांपेक्षा कमी):

  • खेळाडू – 4 बॅग (2 सूटकेस + 2 किट बॅग) किंवा 120 किलो पर्यंत.
  • सपोर्ट स्टाफ- 2 तुकडे (2 सुटकेस) किंवा 60 किलो पर्यंत.

घरगुती सिरीज 

  • खेळाडू – 4 बॅग (2 सूटकेस + 2 किट बॅग) किंवा 120 किलो पर्यंत.
  • सहाय्यक कर्मचारी – 2 तुकडे (2 सूटकेस) किंवा 60 किलो पर्यंत.

धोरणात इशारा देण्यात आला आहे की, “पुढे, बीसीसीआयला कोणत्याही खेळाडूवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा अधिकार आहे ज्यामध्ये यात त्याला आयपीएलसह बीसीसीआयने आयोजित केलेल्या सर्व स्पर्धांमध्ये भाग घेण्यापासून प्रतिबंधित करणे आणि त्यांच्या खेळाडूंच्या करारांतर्गत बीसीसीआयकडून कोणतेही रिटेनरचे पैसे किंवा मॅच फी वजा करणे यांचा समावेश असू शकतो.”

हेही वाचा :

SBI च्या करोडो ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी!

मोठा अपघात, 80 स्थलांतरितांना स्पेनला घेऊन जाणारी बोट मोरोक्कोजवळ उलटली

‘चार मुले जन्माला घाला’; ‘या’ बड्या नेत्याचं ब्राह्मण समाजाला आवाहन