सतर्क राहा! आज ‘या’ जिल्ह्यांना पाऊस झोडपून काढणार

गेल्या दोन-तीन दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस(rain) पडत आहे. आजही (27 सप्टेंबर) राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. परतीचा मान्सून उशिरा आल्याने राज्यातील पिकांचे मोठे नुकसान होते.

कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाची(rain) शक्यता आहे. या भागातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज राज्यातील कोणत्या जिल्ह्यांमध्ये हवामान स्थिती कशी राहील ते जाणून घ्या…

मुंबई, पुण्यासह संपूर्ण राज्याला परतीच्या पावसाने झोडपून काढले आहे. परिणामी उशिरा सुरु झालेल्या परतीच्या पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे बळीराजा चिंतेत आहे. सलग तिसऱ्या दिवशीही मुसळधार पाऊस पडत आहे. आज हवामान खात्याने राज्यातील अनेक जिल्ह्यांना अलर्ट जारी केला आहे. पुढील २४ तास राज्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी आणि सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनकडून करण्यात आले.

मुंबई-ठाणे-नवी मुंबई
मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई परिसरात सकाळपासून मुसळधार पाऊस पडत आहे. सलग तिसऱ्या दिवशी मुंबईसह सर्वत्र पाऊस पडत आहे. सध्या मुंबईत पावसाने चांगलाच जोर धरला असून ऑफीसच्या कामानिमित्त बाहेर पडलेल्या प्रवाशांचे हाल झाले आहेत. सध्या रेल्वेच्या तिन्ही मार्गावरील वाहतूक सुरळीत आहेत. कल्याणमध्ये सकाळच्या सुमारास जोरदार पाऊस झाल्याने रेल्वे स्थानक परिसरात पाणी साचले होते.

पालघर
पालघरच्या डोंगराळ भागात पुन्हा मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून पावसाची हजेरी कायम आहे. डहाणू, बोर्डी, बोईसर, पालघर, तलासरी, विक्रमगड परिसरात संततधार पाऊस सुरू आहे. किंवा पावसामुळे जिल्ह्यातील गुलाबी फुलांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.

पुणे
पुणे शहरात सलग चौथ्या दिवशी पाऊस पडत आहे. शहरातील अनेक भागांत पावसाची संततधार सुरू आहे. आज सकाळपासूनच शहरात शुकशुकाटाचे वातावरण होते. गेल्या तीन दिवसांपासून पुण्यनत पावसाने हाहाकार माजवला आहे. शहरात आज दिवसभर मुसळधार पावसाची शक्यता आहे. उत्तर प्रदेशातून पावसाचा जोर कमी होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

मराठवाडा व विदर्भाला यलो अलर्ट
आज मराठवाडा आणि विदर्भात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता आहे. आज जळगाव, बुलढाणा व विदर्भातील सर्व जिल्ह्यांत सोसाट्याचा वारा व वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

हेही वाचा:

‘धर्मापासून लांब राहणं योग्य…’, ‘आदिपुरुष’ वादावर सैफनं सोडलं मौन

१ ऑक्टोबरपासून होणार ‘हे’ पाच बदल; तुमच्या घरावर होणार इफेक्ट

धक्कादायक! देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयाची नासधूस; सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह