तळीरामांनो सावधान! आता ‘मदिरा’ पिऊन गाडी चालवाल तर…

बेशिस्त वाहन चालकांना चाप लावण्यासोबतच तळीरामांना वठणीवर आणण्यासाठी वाहतूक पोलिसांनी “ड्रंक(drink) अँड ड्राईव्ह”ची विशेष मोहिम सुरू केली असून, दररोज रात्री ११ ते पहाटे ३ पर्यंत शहरातील विविध भागात नाकाबंदी सुरू केली आहे. शहरातील तब्बल २७ ठिकाणी ही कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी १२५ पोलीस अधिकारी, कर्मचार्‍यांची नियुक्ती केली आहे. तर वाहतूक विभागाचे सहायक पोलीस आयुक्त या कारवाईवर लक्ष ठेऊन असणार आहेत.

शहरातील वाहतूकीचा प्रश्न दिवसेंदिवस जठील होत चालला आहे. बेशिस्त वाहन चालकांमुळे त्यात आणखीनच भर पडत आहे. ट्रिपलशीट, राँग साईड तसेच मद्य पिऊन(drink) वाहने चालविणाऱ्यांमुळे वाहतूक कोंडीसोबतच अपघाताला निमत्रंण मिळत आहे. यापार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

शहरातील विविध भागात २७ ठिकाणी रात्रीच्यावेळी नाकाबंदी करून ड्रंक अँड ड्रायईची कारवाई आजपासून सुरू होणार आहे. ब्रिथ अ‍ॅनालायझर मशिनद्वारे चेकींग करून मद्य प्यायलेल्या संशियीत व्यक्तीला पकडले जाणार असून, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. तर, प्रसंगी त्यांची वाहने देखील जप्त केली जाणार आहेत. प्रत्येकवेळी डिस्पोजल पाईप वापरून प्रत्येकी व्यक्तीसाठी हा पाईप नव्याने वापरला जाणार आहे. वाहतूक पोलिसांनी गेल्या १५ दिवसात २४ हजारांहून अधिक बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई केली आहे.

शहरातील लोक संख्येच्या प्रमाणात वाहतूक पोलिसांचे मनुष्यबळ अत्यंत कमी आहे. तरीही वाहतूक पोलिसांकडून कोंडी सोडविण्याचे प्रयत्न होतात. वाहतूक पोलिस दोन सत्रात काम करतात. वाहतूक शाखेतील ९५० पोलीस कर्मचारी दोन सत्रात विविध चौकात वाहतूक नियमन करतात. १ ते १६ ऑक्टोंबरच्या कालावधीत अचानक चेकींग करून पोलिसांनी मद्य प्यायलेल्या ५७० वाहन चालकांना पकडले आहे.

मद्यप्राशन करून वाहने चालविणार्‍यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी वाहतूक विभागाकडून विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. दररोज शहरात २७ ठिकाणी ही कारवाई होईल. त्याचबरोबर राँग साईड, ट्रिपलसीट वाहन चालविणार्‍यांची गंभीर दखल घेतली जात आहे. प्रसंगी वाहने जप्तीची कारवाई करण्यात येत आहे.

हेही वाचा :

सूरज चव्हाणचा पहिलाच सिनेमा वादाच्या भोवऱ्यात

धक्कादायक ! माती खाल्ल्याने आवळला दोन वर्षांच्या बाळाचा गळा

पाच महिने रिचार्ज करण्याची गरज नाही; 400 रुपयांचा हा प्लॅन प्लॅन चालेल 150 दिवस