विश्वासघात! पत्नीने पतीची किडनी विकली अन् प्रियकरासोबत फरार
![](https://alphabetnews.in/wp-content/uploads/2025/02/image-99.png)
आयुष्यात कधी काय होईल याचा काही नेम नसतो. अनपेक्षित संकटे अचानकपणे (living)समोर उभी ठाकतात आणि होत्याचे नव्हते करून टाकतात. पश्चिम बंगालमधील हावडा येथे राहणाऱ्या एका व्यक्तीसोबत असेच काहीसे घडले आहे. त्याच्याच पत्नीने त्याला अशा प्रकारे फसवले आहे की तो अजूनही त्या धक्क्यातून सावरलेला नाही. घरची परिस्थिती सुधारण्याच्या नावाखाली या महिलेने आपल्या पतीची किडनी विकली आणि मिळालेले पैसे घेऊन आपल्या प्रियकरासोबत पलायन केले.
![](https://alphabetnews.in/wp-content/uploads/2025/02/image-83-1024x1024.png)
पती-पत्नीचे नाते विश्वासावर टिकून असते, पण काही लोक ते नाते तोडण्यासाठी क्षणभरही विचार करत नाहीत. अशाच एका पत्नीने आपल्या पतीला अशा प्रकारे फसवले आहे की त्याला आयुष्यभर याचा पश्चाताप होईल. पत्नीच्या गोड बोलण्याला भुलून पतीने वर्षभर आपली किडनी विकण्यासाठी ग्राहक शोधला आणि जेव्हा त्याला खरेदीदार मिळाला तेव्हा त्याला त्याच्या किडनीचा एकही रुपया मिळाला नाही.
महिलेने आपल्या पतीला सांगितले की जर त्याने त्याची एक किडनी विकली तर त्यांना इतके पैसे मिळतील की त्यांच्या घराची परिस्थिती सुधारेल. त्यांची 10 वर्षांची मुलगी मोठी होईल (living)आणि तिचे शिक्षण चांगले होईल, तसेच तिचे लग्नही थाटामाटात होईल. पत्नीच्या बोलण्यावर पतीचा विश्वास बसला आणि त्याने एक वर्ष आपली किडनी विकण्यासाठी ग्राहक शोधण्यात घालवले. मानवी अवयव विकणे बेकायदेशीर असल्याने त्याची किडनी 3 महिन्यांपूर्वी काळ्या बाजारात विकण्यात आली. त्याला 10 लाख रुपये मिळाले. इतका मोठा त्याग केल्यानंतर आपली फसवणूक होणार आहे, याची त्या व्यक्तीला कल्पनाही नव्हती
![](https://alphabetnews.in/wp-content/uploads/2025/02/image-41-1024x1024.png)
पतीने आरोप केला आहे की, त्याची पत्नी बराकपूरमध्ये राहणाऱ्या तिच्या प्रियकराला फेसबुकच्या माध्यमातून भेटली होती आणि दोघांनी मिळून त्याचे आयुष्य उद्ध्वस्त केले. पतीने पोलिसांच्या मदतीने पत्नीला शोधले आणि मुलीसोबत तिला परत आणायला गेला. मात्र, कुटुंब समोर येताच पत्नीने दरवाजा बंद (living)केला आणि घटस्फोटाची धमकी देऊ लागली.
पत्नीने पतीवर त्रास दिल्याचा आरोप करत घटस्फोट मागितला आहे.सध्या या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून हे प्रकरण न्यायालयात पोहोचले आहे. या धक्कादायक घटनेने पुन्हा एकदा पती-पत्नीच्या नात्यातील विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
हेही वाचा :
भन्नाट ऑफर! HP चा लॅपटॉप मिळतोय फक्त 10 हजारात, खरेदीची सुवर्ण संधी
महाराष्ट्र हादरलं! आई-वडिलांनीच मुलीला साखळदंडात डांबून ठेवलं, समाजात खळबळ
ऐश्वर्या राय बच्चनची लेक आराध्याची दिल्ली उच्च न्यायालयात धाव