बिद्री साखर कारखान्याचे उपाध्यक्ष गणपतराव फराकटे यांचं निधन; मंत्री हसन मुश्रीफांना अश्रू अनावर
कोल्हापूर : कागल तालुक्यातील बिद्री साखर कारखान्याचे(sugar factory) उपाध्यक्ष गणपतराव फराकटे यांचे शनिवारी (24 ऑगस्ट) आकस्मिक निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून प्रकृती ठिक नसल्याने कोल्हापुरातील खासगी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते.
उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत (sugar factory)मालवली. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मनोज फराकटे यांचे ते वडील तर कागल पंचायत समितीच्या माजी सदस्या, माजी सरपंच शोभाताई फराकटे यांचे ते पती होत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, एक विवाहित मुलगी, तीन भाऊ, भावजय, पुतणे असा मोठा परिवार आहे.
गणपतराव फराकटे यांची वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा कागलचे आमदार हसन मुश्रीफ यांची कट्टर समर्थक म्हणून ओळख होती. फराकटे यांच्या निधनाचे वृत्त समजताच हसन मुश्रीफ रुग्णालयात पोहोचले. यावेळी सांत्वन करताना मुश्रीफ यांना अश्रु अनावर झाले. हसन मुश्रीफ यांना मताधिक्य देण्यात नेहमीच गणपतराव फराकटे यांनी मोलाचा वाटा उचलला होता.
गणपतराव फराकटे बिद्री साखर कारखान्याचे 2005 पासून संचालक होते. निवडून आल्यानंतर त्यांनी बिद्रीचे उपाध्यक्षपद सांभाळले. गेल्यावर्षी झालेल्या कारखान्याच्या निवडणुकीत त्यांना दुसऱ्यांदा उपाध्यक्षपदी संधी मिळाली. बोरवडेचे पहिले लोकनियुक्त सरपंच म्हणूनही 2017 मध्ये निवडून आले होते.
हेही वाचा :
Telegram चा सीईओ पावेल दुरोवला एअरपोर्टवरुन अटक, ‘ती’ एक चूक पडणार महागात?
लाडकी बहीण योजनेसंदर्भात महाराष्ट्र सरकारने घेतला मोठा निर्णय!
राज्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, ‘या’ 2 जिल्ह्यांना रेड अलर्ट