अर्थसंकल्पात मध्यमवर्गीय आणि गरीबांसाठी मोठी घोषणा?, पंतप्रधान मोदींचे संकेत
देशभरातील नागरिकांचे लक्ष आता 1 फेब्रुवारी 2025 रोजी सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पाकडे(budget) लागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत बजेट सत्राच्या पहिल्या दिवशी केलेल्या भाषणात मध्यमवर्गीय आणि गरीब वर्गासाठी मोठ्या निर्णयांचे संकेत दिले आहेत. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात कर सवलत आणि महागाईपासून मुक्तीसाठी सरकार काही मोठे निर्णय जाहीर करणार का, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात धन आणि समृद्धीची देवी लक्ष्मी यांचा उल्लेख करत, “देवी लक्ष्मी गरीब आणि मध्यमवर्गीयांवर कृपा करोत,” अशी प्रार्थना केली. त्यांच्या या वक्तव्यामुळे कर कपात, महागाईवर नियंत्रण आणि इंधन दर कमी करण्यासंदर्भात मोठ्या घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मागील काही वर्षांत मध्यमवर्गीयांवरील कर भार वाढला आहे. 2020-21 मध्ये इंडिव्हिज्युअल टॅक्स कलेक्शन 4.87 लाख कोटी रुपये होते, जे 2023-24 पर्यंत वाढून 10.45 लाख कोटी रुपयांवर गेले आहे. केवळ तीन वर्षांत 114% वाढ झाली आहे. 2024-25 या आर्थिक वर्षात यात आणखी 22% वाढ होण्याची शक्यता असून, हा आकडा 12.5 लाख कोटी रुपये गाठू शकतो. यामुळे सरकारकडून कर सवलतीच्या मोठ्या घोषणेची अपेक्षा आहे.
भारतात महागाईच्या वाढत्या प्रभावामुळे मागणी आणि खप कमी होत आहे, याचा थेट परिणाम उद्योग जगतावर होत आहे. CII ने सरकारला पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच, 20 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांसाठी कर कपात करण्याची मागणी केली आहे.
1 फेब्रुवारी रोजी सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पात(budget) आयकर मर्यादा वाढवणे, कर दर कमी करणे, पेट्रोल-डिझेलवरील कर कपात आणि महागाई नियंत्रणासाठी ठोस पावले उचलण्याची शक्यता आहे. त्यामुळे देशभरातील नागरिक आणि उद्योग जगत आता या बजेटची आतुरतेने वाट पाहत आहे.
हेही वाचा :
एकनाथ शिंदे नाराज?, महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप होणार?
मोठी बातमी! ममता कुलकर्णीला किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर पदावरून हटवलं
करणवीरने शिल्पा शिरोडकरला केलं किस; अभिनेत्याचं कृत्य पाहून चुमच्या चेहऱ्याचा बेरंग, Video व्हायरल