बीसीसीआयची मोठी घोषणा! IPL च्या प्रत्येक मॅचसाठी खेळाडूंना मिळणार…

इंडियन प्रीमियर लीग ही जगातील सर्वात मोठ्या टी 20 लीगपैकी एक आहे. पुढील वर्षी आयपीएलचा(match) 18 वा सीजन पार पडणार असून आयपीएल 2025 पूर्वी मेगा ऑक्शन घेण्यात येणार आहे. नोव्हेंबरच्या अखेरीस हे मेगा ऑक्शन पार पडण्याची शक्यता असून त्यापूर्वीच बीसीसीआयने मोठी घोषणा करून खेळाडूंना खुशखबर दिली आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून ही घोषणा केली आहे.

जय शाह यांनी केलेल्या घोषणेनुसार आता आयपीएल(match) 2025 पासून खेळाडू आणि प्रत्येक फ्रेंचायझीला मॅच फी सुद्धा मिळणार आहे. याचा अर्थ, कराराव्यतिरिक्त, आता खेळाडूंना प्रत्येक सामन्यासाठी फी देखील दिली जाईल.

विशेष म्हणजे ही फी भारतासाठी आंतरराष्ट्रीय वनडे सामान्यांपेक्षा जास्त आहे. बीसीसीआयचा हा निर्णय अनकॅप्ड खेळाडूंसाठी खूप फायदेशीर ठरेल, ज्यांना सुमारे 20 लाख रुपयांच्या मूळ रकमेत खरेदी केले जाते आणि जे इतर करारबद्ध खेळाडूंच्या तुलनेत एका सीजनमध्ये खूप कमी पैसे कमवतात.

जय शाह यांनी पोस्ट करत म्हंटले की, इंडियन प्रीमिअर लीगमधील सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरीचा आनंद साजरा करण्यासाठी एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात येत आहे. आम्हाला कळवताना अतिशय आनंद होत आहे की, आमच्या क्रिकेटपटूंना प्रत्येक सामन्यासाठी मॅच फी म्हणून 7.5 लाख रुपये दिले जातील, प्रत्येक फ्रँचायझी मॅच फी म्हणून एका हंगामासाठी 12.60 कोटी रुपये खर्च करेल. IPL आणि आमच्या खेळाडूंसाठी हे एक नवीन युग आहे.

बीसीसीआय त्यांच्या सेंट्रल बोर्ड कॉन्ट्रॅक्ट असलेल्या खेळाडूंना प्रति सामन्याची मॅच फी देते. या अंतर्गत टेस्ट सामन्यासाठी खेळाडूंना 15 लाख, तर एका वनडे सामन्यासाठी खेळाडूंना 6 लाख तर टी 20 सामन्यांसाठी खेळाडूंना तीन लाख रुपये मॅच फी म्हणून मिळतात. मात्र बीसीसीआयच्या निर्णयानंतर, आता कमी रक्कम मिळवणारे युवा अनकॅप्ड खेळाडू देखील आयपीएलच्या एका सीजनमध्ये किमान 1 कोटी रुपये कमवू शकतील. बीसीसीआयच्या या निर्णयाचे चाहतेही कौतुक करत आहेत.

हेही वाचा :

शिरढोण आणि टाकवडेत लम्‍पीची लागण; ३ जनावरे दगावली

राज्यातून मान्सूनचा परतीचा प्रवास, आज कसं असेल राज्यातील हवामान?

धूम 4 चित्रपटामध्ये आमिर खान-ऋतिक रोशनला डच्चू, ‘या’ अभिनेत्याची निवड