IPL 2025 पूर्वी KKR ला मोठा धक्का! रणजी मॅचमध्ये स्टार खेळाडूला दुखापत

सध्या भारतीय देशांतर्गत क्रिकेटमध्ये रणजी ट्रॉफी सामन्यांना(match) सुरुवात झाली आहे. बीसीसीआयने टीम इंडियातील खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेट खेळण्याची सक्ती केल्याने अनेक स्टार खेळाडू बऱ्याच वर्षांनी रणजी ट्रॉफी सामन्यात खेळताना दिसत आहेत.

मात्र अशातच सुरु असलेल्या रणजी सामन्यांमधून(match) एक वाईट बातमी समोर आली आहे. आयपीएल 2025 सुरू होण्यासाठी अवघे काही महिने शिल्लक असताना कोलकाता नाईट रायडर्सच्या स्टार खेळाडूला रणजी सामन्यादरम्यान दुखापत झाली, त्यामुळे त्याला रिटायर्ड हर्ट होऊन मैदानाबाहेर जावे लागले.

गुरुवारी 23 फेब्रुवारी पासून मध्यप्रदेश विरुद्ध केरळ यांच्यात सामन्याला सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी मध्यप्रदेशकडून फलंदाजी करणाऱ्या व्यंकटेश अय्यरला दुखापत झाली. व्यंकटेश अय्यर फलंदाजी करताना त्याच्या उजव्या पायाचा घोटा दुखावला त्यामुळे वेदनेने कळवळत व्यंकटेश मैदानावर बसला.

दरम्यान फिजिओ त्याच्या जवळ आले, त्यांनी अय्यरला तपासले परंतु वेदना कमी होत नसल्याने अय्यरला रिटायर्ड हर्ट होऊन मैदानाबाहेर पडावे लागले. दुखापत झालेल्या व्यंकटेश अय्यरला नीट चालता सुद्धा येत नव्हते, फिझिओ आणि राखीव खेळाडूंच्या आधाराने तो मैदानाबाहेर आला. व्यंकटेश अय्यरने 80 बॉलमध्ये 42 धावा केल्या होत्या. मध्यप्रदेशच्या संघाने पहिल्या इनिंगमध्ये 10 विकेट्स गमावून 160 धावा केल्या.

व्यंकटेश अय्यरला झालेली दुखापत फार गंभीर नसावी अशी प्रार्थना कोलकाता नाईट रायडर्स करत असेल. केकेआरने आयपीएल 2025 साठी झालेल्या मेगा ऑक्शनमध्ये व्यंकटेश अय्यरला तब्बल 23.75 कोटी रुपयांना विकत घेतले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार आयपीएल 2025 साठी गतविजेत्या केकेआरचे कर्णधारपद व्यंकटेश अय्यरकडे सोपवले जाऊ शकते. परंतू आयपीएलचा नवा सीजन सुरु होण्यासाठी काहीच महिने शिल्लक असताना व्यंकटेश अय्यरला झालेली ही दुखापत केकेआरचं टेंशन वाढवणारी आहे.

स्टार फलंदाज व्यंकटेश अय्यर हा आयपीएल 2025 मधील तिसरा सर्वात महागडा खेळाडू ठरला. केकेआरने मेगा ऑक्शनपूर्वी अय्यरला रिटेन केले नव्हते. मात्र त्यानंतर 23.75 कोटी रुपयांची मोठी बोली लावून केकेआरने व्यंकटेश अय्यरला खरेदी केलं. ऋषभ पंत हा आयपीएल 2025 मधील आणि इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. लखनऊ सुपर जाएंट्सने त्याच्यावर 27 कोटींची बोली लावली, तर श्रेयस अय्यरला पंजाब किंग्सने 26. 75 कोटींना खरेदी केलं.

हेही वाचा :

करदात्यांना मिळणार दिलासा; इतक्या लाखांचं उत्पन्न करमुक्त होणार?

फिरायला गेलेल्या पर्यटकांवर अचानक कोसळला डोंगर, तलावात पुढे जे घडले… Video Viral

लाईव्ह कॉन्सर्टमध्येच अचानक बिघडली मोनाली ठाकूरची तब्येत, रुग्णालयात केले दाखल!