ऐन विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंना मोठा धक्का!

विधानसभा(assembly) निवडणुकीसाठी येत्या वीस नोव्हेंबरला मतदान होणार आहे, तर तेवीस नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल लागणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेप्रमुख राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर जाणार आहेत, मात्र या दौऱ्यापूर्वीच राज ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे.

बड्या नेत्यानं मनसेला जय महाराष्ट्र केला आहे. आज सायंकाळी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची नाशिकमध्ये जाहीर सभा होणार असून, या सभेमध्ये मनसेचे माजी महापौर अशोक मुर्तडक हे पक्षप्रवेश करणार आहेत.

अशोक मुर्तडक यांच्या पक्ष प्रवेशामुळे नाशिक पूर्व विधानसभा(assembly) मतदारसंघात महाविकास आघाडीची ताकत वाढणार आहे. अशोक मुर्तडक हे महाराष्ट्र नव निर्माण सेनेत प्रदेश सरचिटणीस या पदावर देखील होते.

शोक मुर्तडक हे महाराष्ट्र नव निर्माण सेनेत प्रदेश सरचिटणीस या पदावर देखील होते. मात्र आज ते उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये मशाल हाती घेणार आहेत. अशोक मुर्तडक हे नाशिकमधून विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी इच्छुक होते. मात्र त्याऐवजी प्रसाद सानप यांना उमेदवारी देण्यात आल्याने मुर्तडक हे नाराज होते.

नुकतंच अखिल चित्रे यांनी मनसेला रामराम ठोकून ठाकरे गटात प्रवेश केला. त्याआधी कीर्तिकुमार शिंदे, निलेश जंगमही मनसे सोडून ठाकरे गटात आले होते. तर पुण्यातील माजी नगरसेवक वसंत मोरेही व्हाया वंचित बहुजन आघाडी ठाकरेंच्या शिवसेनेत आले होते.

हेही वाचा :

बिग बॉस 18 वीकेंडच्या वारमध्ये सलमानसोबत येणार 3 पाहुणे

विधेयक फाडले अन् संसेदत करू लागली Haka डान्स, महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल

माता बहिणींच्या केसाला धक्का लावला तर हात उखडून टाकेल, उद्धव ठाकरेंचा धनंजय महाडिकांवर हल्लाबोल