विधानसभेपूर्वी काँग्रेसचा मोठा निर्णय, 13 नेत्यांना दाखवला बाहेरचा रस्ता
येत्या काही दिवसात हरियाणामध्ये विधानसभेसाठी मतदान होणार आहे. यावेळी हरियाणामध्ये मुख्य लढत भाजप आणि काँग्रेसमध्ये(Congress) होत आहे. त्यामुळे भाजपला पुन्हा एकदा सत्ता मिळणार की 10 वर्षानंतर काँग्रेस सत्तेत येणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
तर दुसरीकडे काँग्रेसने(Congress) एक मोठा निर्णय घेत निवडणुकीमध्ये पक्षविरोधी कारवायांसाठी तब्बल 13 नेत्यांना 06 वर्षांसाठी पक्षातून बाहेरचा रास्ता दाखवला आहे. माहितीनुसार यापैकी काहीजण अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. काँग्रेसला तब्बल 10 वर्षांनंतर सत्तेत परतण्याची आशा आहे. त्यामुळे पक्षात तिकिटासाठी चुरस निर्माण झाली असून अनेक नेत्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे काँग्रेससमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत.
तिकिटासाठी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी निवडणुकीपूर्वी आणि निवडणुकीदरम्यान पक्ष सोडले आहे. त्यामध्ये माजी मुख्यमंत्री भूपिंदर हुड्डा यांच्या खास नेत्यांचाही समावेश आहे. तर दुसरीकडे हरियाणातील सोनीपतमधील राय मतदारसंघाचे माजी आमदार जयतीर्थ दहिया यांनी देखील काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. तिकीट न मिळाल्याने संतापलेल्या दहिया यांनी प्रदेश काँग्रेस अध्यक्ष उदयभान यांना राजीनामा पत्र पाठवले.
जयतीर्थ दहिया हे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा यांच्या जवळचे मानले जात मात्र त्यांनी हुड्डा यांच्यावर विश्वासघाताचा आरोप करत काँग्रेस पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच तिकीट वाटपात सौदेबाजी होत असल्याचा आरोपही त्यांनी केला होता.
दहिया यांनी 2009 आणि 2014 च्या निवडणुकीत रायमधून विजय मिळवला होता. 2014 च्या निवडणुकीत तीन मतांनी विजयी झाल्यानंतर ते प्रसिद्धीच्या झोतात आले. हुड्डा यांनी आपल्याला तिकीट देण्याचे आश्वासन दिले होते, परंतु नंतर तिकिटांच्या खरेदी-विक्रीतून आपला घोर विश्वासघात केला, असा दावा त्यांनी केला.
राय मतदारसंघातून काँग्रेसने जय भगवान अंतील यांना उमेदवारी दिली आहे. राज्यात 05 ऑक्टोबरला विधानसभा निवडणुका होणार असून 08 ऑक्टोबरला निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
हेही वाचा:
दसरा-दिवाळी ते नवरात्र, ऑक्टोबर महिन्यात तब्बल 15 दिवस बँका बंद
माजी कर्णधारच्या जीवाला धोका! बोर्डाने सुरक्षा देण्यास दिला नकार
BSNL युजर्ससाठी खुशखबर! 80 दिवसांच्या प्लॅनमध्ये आता मिळणार जास्त डेटा